...तर शैक्षणिक संस्थेची प्रगती शक्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...तर शैक्षणिक संस्थेची प्रगती शक्य
...तर शैक्षणिक संस्थेची प्रगती शक्य

...तर शैक्षणिक संस्थेची प्रगती शक्य

sakal_logo
By

ich166.jpg
89494
इचलकरंजी ः माई बावडेकर शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा नीतूदेवी बावडेकर यांचे संतोष पाटील यांनी स्वागत केले.

...तर शैक्षणिक संस्थेची प्रगती शक्य
नितू बावडेकर; शास्त्रीय बालशिक्षण प्रबोधन कार्यशाळेला प्रतिसाद

इचलकरंजी, ता. १७ ः नव्या शैक्षणिक धोरणाबरोबरच शिक्षणातील नवे संशोधन, तंत्रज्ञान, गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम आणि संस्था-शिक्षक संबंध सौहार्द असेल तर कोणतीही संस्था आपले वैशिष्ट्य जोपासून स्पर्धात्मक परिस्थितीत चांगली प्रगती करू शकते, असे प्रतिपादन माई बावडेकर शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा नीतूदेवी बावडेकर यांनी केले. महाराष्ट्र बालशिक्षण संस्थेच्या इचलकरंजी केंद्राची कार्यकारिणी, कृती समिती आणि शहरातील बालशिक्षण विभागाच्या मुख्याध्यापकांसाठी शास्त्रीय बालशिक्षण विषयक प्रबोधनपर कार्यशाळेत त्या मार्गदर्शन करीत होत्या.
इचलकरंजी केंद्राध्यक्षा डॉ. सपना आवाडे यांनी सध्याच्या शैक्षणिक वातावरणात टिकून रहाण्यासाठी वेगवेगळ्या शाळांचा चाललेला संघर्ष सांगून जे दीर्घकालीन विद्यार्थ्यांच्या हिताचे असेल ते करण्याची शाळांची तयारी असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांची सृजनशीलता खुरटणाऱ्‍या सवंग उपक्रमांऐवजी उपजत गुणांचे संवर्धन करण्यासाठी शास्त्रीय बालशिक्षणाचा प्रसार करण्यास इचलकरंजी केंद्र कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. केंद्राचे सहसचिव अशोक केसरकर यांनी पुढील वर्षाचा कृती आराखडा मांडला.
कार्याध्यक्ष डी. बी. टारे यांनी बालशिक्षण विषयक अभियानाच्या वाटचालीत प्रस्तुत कार्यक्रमाचे महत्व सांगून सकारात्मक प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. शांतीनाथ संस्थेचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी आभार मानले. कार्यशाळेस परिषदेचे अध्यक्ष डी. एम. कस्तुरे, तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी सुजाता शिंदे, केंद्र उपाध्यक्ष मदन कारंडे, सचिव प्रिती कट्टी, हेमल सुलतानपुरे, निर्मला ऐतवडे, हमिदा गोरवाडे, सुधाकर मणेरे, कौशिक मराठे, कृती समिती समन्वयक वैशाली काडे आदी उपस्थित होते.