आबिटकर बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आबिटकर बातमी
आबिटकर बातमी

आबिटकर बातमी

sakal_logo
By

जमीनीचा वर्ग बदलण्यास वर्षाची मुदतवाढ

आमदार आबिटकर यांच्या लक्षवेधीला उत्तर

कोल्हापूर, ता. १६ ः महाराष्ट्र जमीन महसूल नियम, २०१९ मध्ये सुधारणा करून भोगवटादार वर्ग-२ आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-१ रूपांतरीत करताना आकारावयाच्या सवलतीच्या दरातील कालावधीला ७ मार्चे २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येईल. यासंदर्भातील अध्यादेश येत्या पंधरा दिवसात काढू ,असे आश्‍वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.
यासह तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा करा, अशी आग्रही मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी लक्षवेधी सुचनेवेळी केली. त्याला उत्तर देताना श्री. विखे-पाटील यांनी हे आश्‍वासन दिले.
राज्य शासनाने भोगवटादार वर्ग-२ आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-१ रूपांतरित करताना आकारावयाच्या सवलतीच्या दरातील कालावधीला मुदतवाढ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रीमंडळ बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे. ७ मार्च २०२४ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्याची राज्य शासनाने तत्काळ अंमलबजावणी करावी तसेच महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा करुन जिरायत ४० आर व बागायत २० आर क्षेत्राची खरेदी-विक्री करण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. या अधिसुचनेची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही त्या बाबतीतही तत्काळ निर्णय घेण्यात यावा, अशी आग्रही मागणी श्री. आबिटकर यांनी केली.