गड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड
गड

गड

sakal_logo
By

गडहिंग्लजला वळीव पाऊस

गडहिंग्लज : शहर आणि तालुक्यात ठिकठिकाणी गुरुवारी (ता. १६) पहाटे दोनच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला. विजांच्या कडकडाटात झालेल्या या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला होता. गेल्या काही दिवसांपासून हवेतील उष्णता वाढली आहे. बुधवारी (ता. १५) सकाळपासून प्रचंड उष्णता होती. दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार झाले. सायंकाळी हलक्या सरी पडून पाऊस थांबला. त्यानंतर पहाटे एकपासून पुन्हा ढगांचा गडगडाट सुरू होऊन पावसाला प्रारंभ झाला. अर्धा तास हा मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला. या पावसाने कापणीला आलेली ज्वारी काही प्रमाणात काळी पडण्याची भीती व्यक्त होत आहे.