बेमुदत संप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेमुदत संप
बेमुदत संप

बेमुदत संप

sakal_logo
By

89795

प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन, घंटानाद
कर्मचारी, शिक्षकांचा बेमुदत संप; शासकीय कामकाज थांबल्यामुळे सर्वसामान्यांची फरफट सुरूच

कोल्हापूर, ता. १७ : कर्मचारी, शिक्षकांच्या मागण्या योग्य, पण संप बेकायदेशीर असे म्हणणाऱ्या तथाकथित सत्तेतील एका पक्षाच्या हस्तकाचा प्रतीकात्मक पुतळा जाळून त्याला चप्पलाचा हार घालून संबंधित व्यक्तीचा निषेध करण्यात आला. तर, शिक्षकांना मेस्मा लावण्याची भीती घालून संपात फूट पाडण्यासाठी सुशिक्षित बेरोजगाऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करू नका असा इशारा आज शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने दिला. टाऊन हॉल येथे घंटानाद आणि प्रतीकात्मक पुतळा दहन करण्यात आले. संपाचा आज चौथा दिवस असूनही शासनाने दखल घेतली नसल्याने कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, शासकीय कामकाज थांबल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची आजही फरफट सुरू राहिली.
सुशिक्षित बेरोजगारांना भडकविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कर्मचारी शिक्षक संतप्त झाले व तीन दिवसांच्या तुलनेत आज दुपटीने कर्मचारी शिक्षकांनी टाऊन हॉल येथे हजेरी लावली.
समन्वय समातीचे निमंत्रक अनिल लवेकर म्हणाले, ‘‘उद्या (ता. १८) कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावणार आहेत. शासनाच्या शिस्स्तभंगाच्या कारवाईस, मेस्माच्या कारवाईस आम्ही घाबरत नाही. कोणावरही कार्यवाही झाली तर संप अधिकच भडकेल व सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागेल. याला सत्तारूढ सरकार जबाबदार राहिल. गेल्या १७ वर्षांच्या मागणीकडे शासनाने लक्ष दिले नाही म्हणून बेमुदत संप करावा लागला. त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे. शासनाच्या नाकर्तेपणामुळे संपकाळात जनतेच्या गैरसोयीबद्दल जनतेची दिलगिरी व्यक्त केली.
जुनी पेन्शन कोअर कमिटीचे कार्याध्यक्ष सुरेश जाधव, महाराष्र्ट शिक्षक सेनेचे अतीश लोहार व सुशील भांदिगरे, कोल्हापूर जिल्हा म्हाडा संघटनेचे अमोल बारड, दिलीप पोवार, एस. बी. पाटील, प्रा. सुभाष जाधव, अॅड. बळवंत पोवार यानी बेमुदत संपास पाठिंबा दिला. या वेळी श्री. सावंत, राजेश वरक, शैक्षणाक व्यासपीठाचे एस. डी. लाड, भरत रसाळे, शैक्षणिक भारतीचे राज्याध्यक्ष दादासाहेब लाड, संजय क्षीरसागर, नितीन कांबळे, सतीश ढेकळे, संजय खोत, अजित पाटील, मनुजा रेनके उपस्थित होते.

चौकट
संप कधी संपणार याकडे लक्ष
संप मागे घेतला जात नसल्याने लोकांमध्ये रोष वाढत आहे. महसूल, बँक, जलसंपदा, जिल्हा परिषदेतील दैनंदिन कामे प्रलंबित राहिल्याने संप कधी संपणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.