राष्ट्रवादीचा नवीन शहराध्यक्ष कोण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादीचा नवीन शहराध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीचा नवीन शहराध्यक्ष कोण?

राष्ट्रवादीचा नवीन शहराध्यक्ष कोण?

sakal_logo
By

राष्ट्रवादीचा नवीन शहराध्यक्ष कोण?
इचलकरंजीतील राजकीय वर्तुळात उत्सुकता; आठवडाभरात निर्णय शक्य
पंडित कोंडेकर ः सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १७ ः येत्या आठवडाभरात राष्ट्रवादी काँग्रेसला नवीन शहराध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. या पदासाठी माजी नगरसेवक विठ्ठल चोपडे यांचे नाव चर्चेत आहे. गेल्या महिनाभरापासून हे पद रिक्त आहे. महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पदाला महत्त्व असणार आहे.
विद्यमान शहराध्यक्ष प्रकाश पाटील हे आठ वर्षे या पदावर कार्यरत होते. त्यांनी पदाचा राजीमाना देत मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे हे पद रिक्त झाले आहे. सध्या माजी आमदार अशोक जांभळे व पक्षाचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे असे दोन सक्षम गट कार्यरत आहेत. दोन्ही गट अलीकडेच एकत्र आले आहेत. दोन्ही गट एकत्र येऊन विविध आंदोलने करीत आहेत. त्यामुळे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध झाल्याचे सध्याचे चित्र आहे.
दुसरीकडे महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक लवकरच लागणार आहे. पक्षाच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असणार आहे. महाविकास आघाडीचा पॅटर्न येथे राबवण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. यामध्ये तुलनेने राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे रिक्त असलेल्या पक्षाच्या शहराध्यक्ष पदाच्या निवडीला विशेष महत्त्व असणार आहे. त्यादृष्टीने पक्षातील दोन्ही गटाकडून एकत्रितपणे संभाव्य नावांची चाचपणी करण्यात आली.
------
प्रभावी व्यक्तीला संधी देण्याबाबत चर्चा
या पदावर प्रभावी व्यक्तीला संधी देण्याबाबत पक्षीय पातळीवर चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार दोघांच्या नावाची चर्चा करण्यात आली असली तरी माजी नगरसेवक विठ्ठल चोपडे यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. गेली दोन दशकांहून अधिक काळ राजकीय क्षेत्रात चोपडे सक्रिय आहेत. अभ्यासू नगरसेवक म्हणूनही त्यांची ओळख आहे. येत्या आठवड्याभरात पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून या पदाच्या निवडीची घोषणा होण्याचे संकेत पक्षाकडून मिळाले आहेत.