दिव्यांगांच्या लग्नासाठी आता ‘स्पेशल साथी डॉट कॉम’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांगांच्या लग्नासाठी आता ‘स्पेशल साथी डॉट कॉम’
दिव्यांगांच्या लग्नासाठी आता ‘स्पेशल साथी डॉट कॉम’

दिव्यांगांच्या लग्नासाठी आता ‘स्पेशल साथी डॉट कॉम’

sakal_logo
By

89934
यश हुजुरबाजार
89987

दिव्यांगांसाठी ‘स्पेशल साथी डॉट कॉम’
देशभरातून दिव्यांगांची नोंदणी; अनुरुप जोडीदार मिळण्यास मदत.
ओंकार धर्माधिकारी : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : दिव्यांग व्यक्तींच्या लग्नासाठी अनुरूप जोडीदार मिळावा यासाठी पालक खटाटोप करतात. पण अनुरुप जोडीदार मिळत नाही. यासाठी ‘संवाद स्पीच हिअरींग अँड रिसर्च’ यश हुजुरबाजार यांनी ‘स्पेशल साथी डॉट कॉम’ या ॲपची निर्मिती केली. यावर देशभरातील विवाहइच्छुक तरुण, तरुणींची स्थळे पहायला मिळतील. यामुळे त्यांना आपल्याला अनुकूल जोडीदार शोधणे सोपे होईल.
जीवनात जोडीदार असावा अशी बहुतांशीजणांची इच्छा असते. त्यासाठी लग्न जुळवणाऱ्या विविध संस्था कार्यरत आहेत. काही संस्थांनी वेबसाईट आणि मोबाईल ॲप्लीकेशनही बनवले आहेत. त्यामुळे विवाह जुळवण्याचे विविध पर्याय समोर उपलब्ध झाले आहेत. असे असले तरी दिव्यांग व्यक्तींसाठी आजही विवाह जुळवणे ही खडतर गोष्ट आहे. आपल्याला अनुरूप जोडीदार शोधणेच त्यांच्यासाठी अवघड असते. अपंगत्वामुळे शारिरीक हलचालींसाठी मर्यादा असतात. त्यात आपल्याला जे अपंगत्व आहे त्याचप्रमाणे अपंगत्व असणारी मुलगी किंवा मुलगा मिळणेही अवघड आहे. त्यामुळे इच्छा असूनही दिव्यांग व्यक्तींचे लग्न ठरणे अवघड आहे. ही समस्या लक्षात घेऊन संवाद स्पीच हिअरींग अँड रिसर्चच्या यश हुजुरबाजार यांनी ‘स्पेशल साथी डॉट कॉम’ या ॲप्लिकेशनची संकल्पना मांडली. त्याप्रमाणे निल हुजुरबाजार यांनी या ॲपचे डिझाईन आणि सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता केली. त्यामुळे हे ॲप्लिकेशन मूर्तस्वरुपात आले. या ॲपमुळे दिव्यांगांना आपला जोडीदार शोधणे सोपे जाणार आहे. सध्या या ॲपवर सुमारे १५० दिव्यांगांची नोंद आहे. रोटरी मिड टाउन कोल्हापूर, अनटेक प्रा. लि. आणि अनघा शिराळकर यांनी हे ॲप बनवण्यासाठी आर्थिक सहाय्य केले. सध्या हे ॲप मोफत उपलब्ध आहे.
------------------------
दृष्टीक्षेपात ॲप
- २० प्रकारच्या अपंगत्व असणाऱ्यांची नोंद
- मराठीसह विविध भाषांमध्ये ॲप उपलब्ध
- दिव्यांग व्यक्तीची कौटुंबिक, व्यक्तीगत सर्व माहिती उपलब्ध
- आपल्या अपेक्षेनुसार अनुरूप दिव्यांग जोडिदार सुचवण्याची सुविधा
- देशभरातील सर्व स्तरावरील दिव्यांग व्यक्तींची स्थळे
-----------------------
विवाह जुळवण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना अनेक अडचणी येतात. हे लक्षात घेऊन या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. या ॲपमुळे दिव्यांग व्यक्तींना विवाह इच्छुक असणाऱ्या अन्य दिव्यांग व्यक्तींची माहिती मेबाईलच्या एका क्लिकवर उपलब्ध होईल. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींचे कष्ट काही प्रमाणात कमी होणार आहेत याचे समाधान आहे.
- यश हुजुरबाजार
-------------------------------
स्वयंसेवकांची आवश्यकता
या ॲपच्या कामासाठी काही स्वयंसेवकांची आवश्यकता आहे. जे इच्छुक असतील त्यांनी भेंडे गल्लीतील संवाद संवाद स्पीच हिअरींग अँड रिसर्च या संस्थेला भेट द्यावी.