गणपतीचे डोळे कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणपतीचे डोळे कार्यशाळा
गणपतीचे डोळे कार्यशाळा

गणपतीचे डोळे कार्यशाळा

sakal_logo
By

89936
गणेशमूर्ती डोळे रंगविण्याची कार्यशाळा
कोल्हापूर : गणेशमूर्ती तयार झाल्यानंतर तिच्यात जिवंतपणा कसा आणायचा? डोळे कसे रेखाटायचे? अशा असंख्य प्रश्‍नांची उकल आज येथे झाली आणि कुंचल्यातून गणेशाचे डोळे रंगवण्याची ईर्षाच सुरू झाली. महिलांनी गणेशमूर्तीचे डोळे रेखाटून रंग भरण्याचा अनुभव घेतला. निमित्त होते दि. वि. फाऊंडेशनतर्फे आयोजित गणेशाचे डोळे व सोंडेवरील डिझाईन बनविण्याच्या कार्यशाळेचे. शाहूपुरी नवव्या गल्लीत संत गोरोबा कुंभार सांस्कृतिक हॉलमध्ये आयोजन केले आहे. उद्याही (ता. १९) दुपारी चार ते सायंकाळपर्यंत कार्यशाळा होईल. सतीश वडणगेकर, उदय कुंभार, शुभम कुंभार, दिनकर कुंभार, व्यंकटेश निगवेकर, निहाल बीडकर यांनी मार्गदर्शन केले. कोल्हापूरसह सांगली, सातारा, कऱ्हाड, सांगोला, शिरोळ, कर्नाटक, अथणी, इचलकरंजी, कबनूर परिसरातील १४८ महिलांनी कार्यशाळेत सहभाग नोंदवला. कलाकार सतीश वडणगेकर म्हणाले, ‘महाराष्ट्रात नव्हे तर देशात गणेशमूर्ती डोळे आखणी कार्यशाळा पहिल्यांदा होत आहे. त्याला प्रतिसाद चांगला मिळाला. त्याचा फायदा प्रत्येक कुंभार समाजाला होणार आहे.’