Tue, March 21, 2023

पालकमंत्री केसरकर दौरा बातमी
पालकमंत्री केसरकर दौरा बातमी
Published on : 18 March 2023, 5:58 am
पालकमंत्री आज कोल्हापुरात
कोल्हापूर ः पालकमंत्री दीपक केसरकर आज (ता.१९) कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी ७.३० वाजता त्यांचे आगमन होईल. त्यानंतर ते नऊ वाजता अंबाबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतील. येथेच ते मंदिरातील व्यवस्था आणि कामकाजाचा आढावा घेणार आहेत. ९.३० वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मॉड्युलर ओटीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतील. त्यानंतर दुपारी १२ वाजता खेडकडे (जि. रत्नागिरी) रवाना होतील.
................