सीपीआर मॉडीलर ओटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीपीआर मॉडीलर ओटी
सीपीआर मॉडीलर ओटी

सीपीआर मॉडीलर ओटी

sakal_logo
By

90186
कोल्हापूर : सीपीआरमधील मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे उद्‍घाटन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. या वेळी नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, डॉ अजित लोकरे डॉ. प्रदीप दीक्षित डॉ गिरीश कांबळे आदी उपस्थित होते. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)

‘सीपीआर’साठी ३८ कोटींचा आरखडा
पालकमंत्री दीपक केसरकर; मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे उद्‍घाटन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ : ‘‘सीपीआर रुग्णालय सुसज्ज करण्यासाठी ३८ कोटी रुपयांचा आरखडा तयार करण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा झाली आहे. त्याला मंजुरी लवकरच मिळेल. त्यातून समाजातील गरजू घटकांसाठीची उपचार सुविधा सक्षम करण्यासोबत सीपीआर इमारतीचे वैभवही टिकवले जाईल.’’ अशी ग्वाही पालकमंत्री दिपक केसरकर यांनी दिली आज येथे दिली.
सीपीआर रुग्णालयात बालरोग अतिदक्षता विभाग व मॉड्युलर ओटी सुविधांचे लोकार्पण पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते झाले या वेळी ते बोलत होते.
केसरकर म्हणाले, ‘‘सीपीआर इमारतीचे महत्व संस्थान काळापासून आहे. माजी आरोग्य मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या काळात वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. उपचार सुविधा सक्षम झाल्या. कोल्हापूरसह शेजारच्या जिल्ह्यातील रूग्णांना त्याचा लाभ होत आहे.’’
राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘‘सीपीआरच्या प्रश्नांवर लक्षवेधी लावून आवाज उठवला. त्यातून चतर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळाले. सिव्हीटीसीला परवानगी मिळाली. रिक्त पदे भरली, सिटी स्कॅन, कॉमन वेल्थ सेंटरची सुविधा झाली. मॉड्युलर ओटी व बालरोग दक्षता विभागाचा गरजू घटकांना लाभ होईल.’’
जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, अधिक्षक डॉ. गिरीश कांबळे, कान नाक घसा विभाग प्रमुख डॉ. अजित लोकरे, डॉ. वसंत देशमुख, डॉ. महेंद्र बनसोडे, डॉ. राहूल बडे आदी उपस्थित होते.
------------------
चौकट
जंतू संसर्ग टाळण्यास मदत
नव्या सुविधेमुळे सांधेरोपन, अवयव प्रत्यारोपन, कानाचे कॉक्लीकअर इप्लांन्ट आदी शस्त्रक्रिया होतील. मॉड्युलर ओटीमुळे शस्त्रक्रियेनंतरचा जंतू संसर्ग टाळला जातो. त्यामुळे रूग्ण लवकर बरा होण्यास मदत होते.