आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंदोलन
आंदोलन

आंदोलन

sakal_logo
By

90376
कोल्हापूर : आर्य क्षत्रिय समाज संस्था निवडणूक प्रक्रियेची चौकशी करावी या मागणीसाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयासमोर मनसे कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केले. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)

धर्मादाय कार्यालयासमोर
‘मनसे’चे घंटानाद आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० : आर्य क्षत्रिय समाज संस्थेच्या निवडणुकीमध्ये संविधानांतील (सार्वजनिक न्यास नोंदणी अधिनियम १९५०)  आचारसंहितेचा भंग करणाऱ्या व त्यांना पाठीशी घालणाऱ्या धर्मादाय उपायुक्त प्रदीप चौधरी व निरीक्षक आसिफ शेख यांच्या विरुद्ध सबळ पुरावे देऊनसुद्धा कारवाई करण्यात आलेली नाही. या विरोधात केलेल्या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून ‘मनसे’च्या कार्यकर्त्यांनी धर्मादाय उपायुक्त कार्यालयासमोर ‘घंटानाद स्मरण’ आंदोलन केले.
संस्थेच्या निवडणुकीत मतमोजणीवेळी झालेल्या मतदानाच्या निम्म्याच मतदानाची मोजणी केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. याबाबतचे लेखी पुरावे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिले. या पुराव्यांची दखल घेऊन चार दिवसांमध्ये निवडणूक निरीक्षक आसिफ शेख यांना बडतर्फ करावे तसेच संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची न्यायालयीन निष्पक्ष चौकशी करून यातील दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी संघटनेचे प्रसाद पाटील यांनी केली.
बागल चौकातील कार्यालयासमोर क्रेनला बांधलेली घंटा वाजवून निषेध व्यक्त केला. दोषींवर कारवाई न केल्यास  राज्याचे धर्मादाय आयुक्त, मुख्य निवडणूक आयुक्त, मुख्यमंत्री यांच्यासमोर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनी दिला. यानंतर सहाय्यक आयुक्त हेरलेकर यांच्या कार्यालयाच्या बंद दरवाजावर आंदोलनाच्या आशयाचे निवेदन बोर्डाच्या स्वरूपात लावले. आंदोलनामध्ये विजय करजगार, अमित पाटील, नीलेश धुम्मा, यतीन होरणे, सागर साळुंखे, चंद्रकांत सुकटे, अभिजित राऊत, संजय करजगार, ॲड. मोतीलाल बुधले, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.