Fri, June 9, 2023

आजरा ः संक्षिप्त बातमी
आजरा ः संक्षिप्त बातमी
Published on : 22 March 2023, 1:48 am
ajr202.jpg....
90381
कोल्हापूर ः खासदार धनंजय महाडिक यांना मागणीचे पत्र देताना दिगंबर देसाई. यावेळी संग्रामसिंह कुपेकर व अन्य मान्यवर.
सिरसंगीत रस्त्यासाठी निधीची मागणी
आजरा ः येथील रस्त्याच्या अंतर्गत खडीकरण व डांबरीकरणासाठी 20 लाख रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी आजरा साखर कारखान्याचे संचालक दिगंबर देसाई यांनी केली आहे. खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेऊन मागणीचे पत्र देसाई यांनी दिले. सिरसिंगीसाठी २० लाखांचा निधी मिळाला की गावातील प्रमुख रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम होईल. खासदार महाडिक यांनी निधी देण्याची ग्वाही देसाई यांना दिली. यावेळी संग्रामसिंह कुपेकर, भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कृष्णराज महाडिक, नारायण साटपे, राजू मुरुकटे, प्रभाकर देसाई यांच्यासह प्रमुख उपस्थित होते.