आयजीएममध्ये उभारली आरोग्याची गुढी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयजीएममध्ये उभारली आरोग्याची गुढी
आयजीएममध्ये उभारली आरोग्याची गुढी

आयजीएममध्ये उभारली आरोग्याची गुढी

sakal_logo
By

ich221.jpg
90681
इचलकरंजी : आयजीएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांतर्फे आमदार आवाडे यांचा सत्कार केला.

आयजीएममध्ये उभारली आरोग्याची गुढी

इचलकरंजी, ता. २२ : शहरातील आयजीएम रुग्णालयात प्रथमच गुढी उभारली. रुग्णालयास ३०० बेडची मान्यता मिळवून देण्यामध्ये विशेष प्रयत्न केलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांचे आभार मानून सत्कार केला. आयजीएम रुग्णालय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आवश्यक त्या सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज होऊन राज्यातील अत्युच्च दर्जाचे रुग्णालय बनेल, असा विश्‍वास आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला.
शहर परिसर व कर्नाटक सीमा भागातील गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांचे आधारवड असलेल्या आयजीएम रुग्णालयास राज्य शासनाने नुकतीच ३०० बेडची मान्यता दिली आहे. याचे औचित्य साधत रुग्णालयाच्या आवारात आमदार प्रकाश आवाडे यांच्याहस्ते गुढी पाडव्यानिमित्त आरोग्याची गुढी उभारली. साखर व पेढे वाटून आनंद साजरा केला. आमदार आवडे यांनी आयजीएममध्ये आमुलाग्र बदल होत आहे. सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे हे रुग्णालय होणार आहे. रुग्णालय ३०० बेडचे करण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे मान्यता मिळाली. सध्या येथे आवश्यक स्टाफ उपलब्ध असून आता 300 बेडची मान्यता मिळाल्याने आणखीन 152 जणांचा स्टाफ मिळणार असल्याचे सांगितले. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. नंदकुमार बनगे, डॉ. महेश महाडीक, राजू पाटील, भरत शिंदे, तेजस पाटील, बाबासाहेब चौगुले, स्वप्निल आवाडे, डॉ. राहुल आवाडे, किशोरी आवाडे, सपना आवाडे, प्रकाश दत्तवाडे, कपिल शेटके, अहमद मुजावर, अरुण निंबाळकर, नरसिंह पारीक, राजू बोंद्रे, संजय केंगार, प्रशांत कांबळे, आदी उपस्थित होते.
------------
महामारीत कर्तव्य बजावलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्या
रुग्णालयास ३०० बेड मंजूरी मिळाल्याने सफाई कर्मचाऱ्यांची आवश्यकता अधिक भासणार आहे. कोरोनामध्ये रुग्णालयात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी रुग्ण कल्याण समिती सदस्य कपिल शेटके यांनी आमदार प्रकाश आवडे यांच्याकडे केली. याबाबत संबंधित विभागाशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन आमदार आवडे यांनी दिले.