
जयसिंगपूरला उद्या आनंद मेळावा
जयसिंगपूरला उद्या आनंद मेळावा
जयसिंगपूर, ता. २२ः ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीतर्फे आनंद मेळावा २०२३ चे आयोजन केले आहे. शुक्रवारी (ता. २३) सन्मती हॉल (काडगे मळा) येथे सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच यावेळेत आनंद मेळावा होणार आहे. प्रथम सत्राचे उद्घाटन आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते होणार आहे. आर्मी रिटायर्ड कॅप्टन हरी जगताप अध्यक्षस्थानी असतील. शासनाच्या ज्येष्ठांसाठीच्या योजना या विषयावर फेसकॉमच्या उपाध्यक्ष अंजुमन खान, जगू पण आनंदे या विषयावर गणेश उर्फ ऋषिकेश खारगे यांचे व्याख्यान आहे. द्वितीय सत्राचे उद्घाटन जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांच्याहस्ते होणार आहे. शिरोळ तालुका ज्येष्ठ नागरीक समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. आण्णासाहेब क्वाणे अध्यक्षस्थानी असतील. जयसिंगपूर कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार ज्येष्ठांच्या समस्या व सामाजिक बांधिलकी या विषयावर व्याख्यान होणार आहे. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होईल. यात आठ संस्था सहभागी होणार असून आनंद मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.