
क्षीरसागर वाढदिवस
90781
ऋतुराज क्षीरसागर यांचा
वाढदिवस विविध उपक्रमांनी
कोल्हापूर, ता. २२ ः अंबाबाई भाविकांसाठी अन्नदान, गोशाळेत गोमाता पूजन अशा विविध सामाजिक उपक्रमांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर यांचा वाढदिवस साजरा झाला.
यावेळी गरजू गोरगरिबांना मोफत अन्नदानाची अविरत सेवा बजावणाऱ्या श्री उत्तरेश्वर थाळी उपक्रमास ऋतुराज यांच्यामार्फत ग्रायंडर मशीन भेट दिले. यानंतर सीपीआर चौकात गोरगरिबांना अन्नदान करण्यात आले. चंबुखडी येथील मातोश्री वृद्धाश्रमात जेष्ठ नागरिकांना स्नेहभोजन देण्यात आले.
सायंकाळी शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, युवा नेते पुष्कराज क्षीरसागर, दिशा ऋतुराज क्षीरसागर, कु.कृष्णराज, कु.आदिराज यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. शिवसेना शाखा अष्टविनायक ग्रुप यांच्यामार्फत रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली.
शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, माजी महापौर मारुतराव कातवरे, माजी नगरसेवक ईश्वर परमार, राजू हुंबे, सामजिक कार्यकर्ते विकी महाडिक, रियाज सुभेदार, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, महानगरसमन्वयक जयवंत हारुगले, शहरप्रमुख रणजीत जाधव, शहरप्रमुख महेंद्र घाटगे, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, उदय भोसले, रमेश खाडे, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगल साळोखे, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर उपस्थित होते.