क्रीडा प्रशाला उभारणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रीडा प्रशाला उभारणार
क्रीडा प्रशाला उभारणार

क्रीडा प्रशाला उभारणार

sakal_logo
By

क्रीडा प्रशाला उभारणार
राजर्षी शाहू समृध्द शाळा अभियानही राबविणार
कोल्हापूर, ता. २३ ः सासने मैदान येथील सासने विद्यामंदिरमध्ये अनिवासी विद्यार्थी क्रीडा प्रशाला, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दिव्यांग संसाधन कक्ष, राजर्षी शाहू समृध्द शाळा अभियान महापालिकेची प्राथमिक शिक्षण समिती राबविणार आहे. आज सादर केलेल्या अंदाजपत्रकात त्यासाठीच्या निधीची तरतूदही केली आहे.
समितीने २०२३-२०२४ साठी ८० कोटी ७५ लाख १४ हजार ९६७ रूपयांचे अंदाजपत्रक सादर केले आहे. त्यात शासनाकडे प्रस्तावित तरतूद २७ कोटी ७४ लाख ५३ हजार १७८ तर महापालिकेकडे प्रस्तावित तरतूद ४९ कोटींची आहे. यंदाच्या अंदाजपत्रकात स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याच्या सुविधांचा दर्जा उंचावणे, भिंती बोलक्या करणे, संरक्षक भिंती आणि गेट बसविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. संगणक, विज्ञान प्रयोगशाळा, बाल वाचनालयाचे प्रस्ताव तयार केले आहेत.
सासने विद्यामंदीर येथे अनिवासी विद्यार्थी क्रीडा प्रशाला योजना राबवली जाणार आहे. दहा लाख रूपयांचा निधी दिला असून १४ वर्ष वयोगटाखालील शासकीय व संघटना क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होतील अशांकरिता ही योजना आहे. त्यात ॲथलेटीक्स, खो-खो, कबड्डी, रग्बी या क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पाचवी ते सातवीतील २५ मुले व २५ मुली असतील. शहरस्तरीय दिव्यांग संसाधन कक्षासाठी दहा लाखांची तरतूद केली आहे. विविध प्रकारच्या दिव्यांगांसाठी विविध साधने घेण्यात येणार आहेत. राजर्षी शाहू समृध्द शाळा अभियान ५८ शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यातून शाळांचा भौतिक व गुणात्मक विकास साध्य करण्यासाठी विधायक स्पर्धा निर्माण करण्याचा उद्देश आहे, तर निवडक पाच शाळांना मॉडेल स्कूल बनवण्याचा १५ लाखांचा आराखडा तयार केला आहे.
-------------
चौकट
६० विद्यार्थ्यांचा वाद्यवृंद
महापालिका शाळांतील ६० विद्यार्थ्यांचा वाद्यवृंद तयार केला जाणार आहे. त्यासाठी पाच लाख रूपयांचा निधी दिला जाणार आहे. त्यातून सुप्त कलागुणांचा अविष्कार सादर करता येणार आहे. ३५० वर्गांना ई-लर्निंग सुविधा आवश्यक आहे. २० लाखातून ८० वर्ग खोल्यामधून ई-लर्निंग सुविधा दिली जाणार आहे. उर्वरित १२० वर्गांना सीएसआर फंड व दानशूरांकडून यंत्रणा देण्याचा प्रयत्न आहे. पाचवी ते सातवी पर्यंतच्या शिष्यवृत्तीत यशस्वी झालेल्या निवडक विद्यार्थ्यांना विज्ञान शैक्षणिक सहलीअंतर्गत पुणे येथील आयुका, राजा केळकर विज्ञान संग्रहालय तसेच मुंबई येथील नेहरु तारांगण येथे सहल घडवण्यात येणार आहे.