प्रकट दिन सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रकट दिन सोहळा
प्रकट दिन सोहळा

प्रकट दिन सोहळा

sakal_logo
By

90977, 90979
स्वामी समर्थ महाराज की जय!
भक्तिपूर्ण वातावरणात प्रकट दिन सोहळा; पालखी, महाप्रसाद कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : ‘‘अनंतकोटी ब्रम्हांडनायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय,’’ अशा जयघोषात आज श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा सर्वत्र साजरा झाला. सवाद्य मिरवणुकीने झालेले पालखी सोहळे, महाप्रसाद, भजन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल यानिमित्ताने राहिली. रूईकर कॉलनीतील प्रज्ञापुरी, कोटीतीर्थ, जवाहरनगर स्वामी समर्थ मंदिर, मस्कुती तलाव दत्त मंदिर, बिनखांबी गणेश मंदिर परिसरातील स्वामी समर्थ मंदिर, संभाजीनगर मगरमठी येथील श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ आणि कसबा बावडा येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्रात सकाळपासूनच धार्मिक विधी झाले.
प्रज्ञापुरी येथे सायंकाळी पाच वाजता स्वामी समर्थ पालखी आनंद सोहळा झाला. शुक्रवारी (ता. २४) जोगेवाडी (ता. राधानगरी) येथील नारायण एकल महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने सोहळ्याची सांगता होईल. जवाहरनगरातील स्वामी समर्थ सेवा समुहातर्फे सकाळी पालखी सोहळा झाला. या वेळी लेझिम, बँड, सनई - चौघडा, तुतारी अशा पारंपारिक वाद्यांच्या गजरात स्वामी समर्थांचा जयघोष करण्यात आला. पालखी मार्गावर भाविकांनी ठिकठिकाणी सरबताचे वाटप केले. श्री स्वामी समर्थ सेवा समुहाचे हे ३४ वे वर्ष आहे. त्यानंतर झालेल्या महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला. राजेंद्र खैरमोडे व विद्या खैरमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा झाला. गेले पाच दिवस सुरू असलेल्या सोहळ्याची सांगता सायंकाळी आरतीने झाली. सायंकाळी लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रमही झाला. कोटीतीर्थ स्वामी समर्थ मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले. संभाजीनगर मगरमठी येथील स्वामी समर्थांची पुजा श्रीकांत मगर, संदीप खोत, अभिजित सूर्यवंशी, संकेत सुतार, यशराज पोवार व रवी शिंदे यांनी बांधली. रात्री स्वामी समर्थांचा जयघोष आणि भजनाने उत्सवाची सांगता झाली.
-------
चौकट
शिये येथे रुद्र महाभिषेक
शिये येथील हनुमाननगरातील श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान, श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन उत्साहात साजरा झाला. श्री. कुलकर्णी यांनी पूजा बांधली. सकाळी सातपासून रुद्र महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाआरती झाली. या वेळी स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष पोवार - वाईकर, संजय पोवार - वाईकर, हनुमान विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष जयसिंग काशीद, प्रदीप पाटील, अवधूत पाटील, प्रशांत पाटील, तानाजी पोवार, गणेश पोवार, विनायक पोवार, विनायक जोशी, अमर जाधव, रणजीत जाधव, अमर थोरात, विश्‍वजीत गाडवे, रमेश परीट उपस्थित होते.