
मंगळसूत्र लंपास
पॉलिशच्या बहाण्याने मंगळसूत्र पळविले
कोल्हापूर ः पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने एका अज्ञात महिलेने सविता विनायक जोशी (वय ७२, रा. मंडलिक पार्क, १३ वी गल्ली, राजरामपुरी, कोल्हापूर) यांचे तीन तोळ्यांचे मंगळसूत्र पळविले. ही घटना मंगळवारी (ता. २१) रात्री सात ते साडेसातच्या दरम्यान घडली. याबाबत सतीश विनायक जोशी (वय ३६, रा. मंडलिक पार्क, १३ गल्ली, राजारामपुरी) यांनी काल (ता. २२) रात्री उशीरा राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एक लाख २० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र लांबवल्याचा गुन्हा पोलिसांनी अज्ञात महिलेवर दाखल केला.
......................
शहरातून दोन दुचाकी लंपास
कोल्हापूर ः शहरातील मंगळवार पेठ परिसरातील बेलबागेत घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरट्याने लंपास केली. ही घटना सोमवारी (ता. २०) रात्री ते मंगळवारी (ता.२१) पहाटेच्या दरम्यान घडली. याबाबत प्रथमेश सागर जाधव (वय २०, रा. बेलबाग, मंगळवार पेठ) याने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दुसऱ्या घटनेत महापालिकेसमोरच्या पार्किंमधील दुचाकी चोरट्याने लांबवली. ही घटना सोमवारी (ता. २०) रात्री साडेआठ ते पावणेनऊच्या दरम्यान घडली. याबाबत पप्लहू दिवसे (वय २२, रा. नागदेववाडी (ता. करवीर) याने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.