मुश्रीफ गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुश्रीफ गुन्हा
मुश्रीफ गुन्हा

मुश्रीफ गुन्हा

sakal_logo
By

आणखी २५ शेतकऱ्यांचे तक्रार अर्ज
घोरपडे कारखाना प्रकरण ः तपास अर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे

कोल्हापूर, ता. २३ ः सेनापती कापशी (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात समभाग खरेदी आणि सभासद नोंदणीच्या आमिषाने माजी मंत्री तथा आमदार हसन मुश्रीफ यांनी फसवणूक केल्याची तक्रार अर्ज आज आणखी २५ शेतकऱ्यांनी सादर केला. यापूर्वी या प्रकारणी १३ शेतकऱ्यांची सुमारे ४० कोटी रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद मुरगूड पोलिस ठाण्यात दिली आहे.
दरम्यान, या गुन्ह्याचा तपास नुकताच आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविला आहे. आज या प्रकरणात आणखी २५ शेतकऱ्यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाल्याची माहिती अर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपअधीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दिली.
मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांकडून ४० हजार शेतकऱ्यांकडून प्रत्येकी दहा हजार रुपये घेऊन सुमारे ४० कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. त्यानंतर या प्रकरणी विवेक विनायक कुलकर्णी (रा. कागल) यांच्यासह १३ शेतकऱ्यांनी २६ फेब्रुवारीला मुरगूड पोलिस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आमदार मुश्रीफ यांच्यावर ४० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्हा राजकीय हेतून प्रेरित असल्याचा आरोप करत त्याला मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने या प्रकरणात २४ एप्रिलपर्यंत मुश्रीफ यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले होते. यावरील पुढील सुनावणी प्रलंबित असतानाच आज आणखी २५ शेतकऱ्यांनी कारखान्याकडून फसवणक झाल्याचा तक्रार अर्ज अर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे दिला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवला. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासाची सूत्रे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने स्वीकारली असून, तक्रारदार शेतकऱ्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.

चौकट
एकूण ३५ शेतकऱ्यांचे अर्ज
दरम्यान, फिर्यादी कुलकर्णी यांच्यासह १३ शेतकऱ्यांनी सुरुवातीला पोलिसांकडे तक्रार अर्ज दिले होते. मात्र, गुन्हा दाखल होताच तक्रारींचा ओघ वाढत आहे. आणखी २२ शेतकऱ्यांनी तक्रार दिल्याने एकूण ३५ शेतकऱ्यांचे अर्ज आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे पोहोचले आहेत. याची व्याप्ती आणखी वाढू शकते, अशी माहिती पोलिसांनी दिली.