
आजरा ः पोलीस वृत्त
90999
चितळे (ता. आजरा) ः जप्त केलेल्या गोवा बनावटीचा दारू साठासह आरोपी, पोलिस उपनिरीक्षक युवराज जाधव व पोलिस कर्मचारी.
चितळेत गोवा बनावटीची दारू जप्त
आजरा ः चितळे (ता. आजरा) येथे बेकायदेशीररित्या विक्रीसाठी आणलेल्या गोवा बनावटीच्या दारूचा साठा जप्त केला आहे. 30 हजार 504 रुपये किंमतीचा मुद्देमाल आहे. आजरा पोलिसांच्या पधकाने ही कारवाई केली असून, सुनिल सुरेश घुरे (वय 37 चितळे, (ता. आजरा) यांला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस हवालदार सुनिल कोईंगडे यांनी फिर्याद दिली आहे. घुरे यांने जनावरांच्या गोठ्याच्या मागील जागेत एका गवताच्या गंजीमध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा साठा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बुधवारी (ता. 22)सायंकाळी पोलिसांनी छापा टाकून दारू साठा पोलिसांनी जप्त केला. घुरे यांने सातवणे (चंदगड) येथील एकाकडून हा साठा आणल्याचे सांगितले आहे. त्याबाबत पोलिस शोध घेत आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव यांच्या पथकाने कारवाई केली. पोलिस हवालदार दता शिंदे तपास करीत आहेत.