१०२ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१०२
१०२

१०२

sakal_logo
By

माजी सैनिक म्हणून ओळखपत्र
मानधनही देण्याची मागणी

कोल्हापूर, ता. २३ः माजी सैनिक म्हणून सैनिकांना व त्यांच्या वारसांना ओळखपत्र मिळावे, मानधनही मिळावे यासह विविध मागण्या सोनगे येथील बिगर पेन्शनर्स सेना माजी सैनिक असोसिएशन यांनी आज पत्रकार परिषदेत केल्या. मागण्यांचे निवेदन केंद्र व राज्य सरकारला पाठवण्याची माहितीही त्यांनी दिली.
प्रादेशिक सेनेचे 109 बटालियन मध्ये 1989 पूर्वी निवृत्त झालेल्या जवानांची ही संघटना आहे. यातील काही जणांनी भारत चीन व भारत-पाक युद्धातही सहभाग घेतला आहे. काहींना राष्ट्रपतींकडून गौरव चिन्ह, मेडल मिळालेले आहे. कारगिल युद्धात अंतर्गत सुरक्षेचे काम केले आहे.
सेवानिवृत्तीनंतर पेन्शन अथवा मानधन मिळत नसल्याने या सेवानिवृत्त सैनिकांचे व्यक्तिगत, कौटुंबिक जीवन अडचणीत आले आहे. औषध उपचारासाठीही पैसे नाहीत. अनेकांना ओळखपत्र नसल्याने कॅन्टीनचा लाभ घेता येत नाही तर काही माजी सैनिकांवर मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सुगंध मोरे, सचिव रंगराव कांबळे, सदस्य विष्णू महाजन शिवाजी कदम यांनी यावेळी केली