Mon, May 29, 2023

वसंत पोवार, नितीन गुरव यांची निवड
वसंत पोवार, नितीन गुरव यांची निवड
Published on : 24 March 2023, 11:41 am
ajr241.JPG
91112
वसंत पोवार, नितीन गुरव
वसंत पोवार, नितीन गुरव यांची निवड
आजरा ः वेळवट्टी (ता. आजरा) येथील श्री दत्त पंचक्रोशी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी वसंत पोवार यांची तर उपाध्यक्षपदी नितीन गुरव यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदासाठी श्री. पोवार यांचे नाव भिकाजी गुरव यांनी सुचवले. शिवाजी कुंभार यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी श्री. गुरव यांचे नाव सुरेश होडगे यांनी सुचवले. मारुती पोवार यांनी अनुमोदन दिले. संस्थेचे माजी संचालक सुधीर देसाई यांच्याहस्ते नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला. मारुती पोवार, मनिषा देसाई, विजया पावले, तुकाराम तावडे, कविता तेजम, निवृत्ती कांबळे, महेश माने उपस्थित होते. पतसंस्थेच्या व्यवस्थापक शकुंतला डोंगरे यांनी आभार मानले.