पेटलेल्या बसचे थर्ड पार्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेटलेल्या बसचे थर्ड पार्टी
पेटलेल्या बसचे थर्ड पार्टी

पेटलेल्या बसचे थर्ड पार्टी

sakal_logo
By

केएमटी बसच्या आगीची
त्रयस्थ यंत्रणेकडून तपासणी
कोल्हापूर, ता. २४ : केएमटी प्रशासन जास्तीत जास्त बस रस्त्यावर आणण्यासाठी प्रयत्न करत असताना काल नव्यातील एक बस पेटली. त्याचे कारण शोधण्यासाठी प्रशासन आता त्या बसची त्रयस्थ यंत्रणेकडून तपासणी करून घेणार आहे.
केएमटीच्या ताफ्यातील बहुतांश बस जुन्या आहेत. त्यानंतर केंद्र सरकारच्या ‘जेएनयुआरएम’ याजनेमधून मिळालेल्या निधीतून छोट्या बस घेण्यात आल्या. इलेक्ट्रिक प्रकारातील त्या बस असून त्याच्या दुरूस्तीचे प्रश्‍न प्रथमपासून भेडसावत आहेत. यामुळे या नव्या बसमधील १४ बस सध्या विविध कारणांमुळे बंद आहेत. नव्यातीलच एक बस गुरूवारी शिरोली जकात नाक्याजवळ पेटली. प्रथमदर्शनी शॉर्टसर्किटने ती बस पेटल्याच्या निष्कर्षाप्रत प्रशासन आले आहे. पण आता एक एप्रिलपासून केएमटीच्या ताफ्यात याच नव्या बस असतील. त्यामुळे या बसचा नेमके कारण शोधण्यासाठी त्रयस्थ यंत्रणेकडून तपासणी केली जाणार आहे. त्यावरून इतर बससाठी दक्षता घेतली जाऊ शकते, असे अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक टीना गवळी यांनी सांगितले.