विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित
विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

sakal_logo
By

फोटो-91246
..........................
विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

खंडेराव जगदाळे; सर्व शिक्षक आमदार तहात हरले

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः विनाअट अनुदान द्यावे, या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीच्या नेतृत्वाखाली विनाअनुदानित शिक्षकांनी धरणे आंदोलन केले. त्यावर सद्यःस्थितीत आधार वैध असलेले विद्यार्थी विचारात घेऊन ऑनलाईन अंतरिम संच मान्यता करण्यात येईल, असे पत्र शिक्षण आयुक्तांनी काढले. आमची मागणी नीट लक्षात न घेता पत्र काढण्यात आले. आता दुसरा कोणताही पर्याय नसल्याने आम्ही आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याचे कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले.
आमची मागणी काय होती आणि तांत्रिक बाबीचा कोणताही विचार न करता जे पत्र काढले आहे, त्यानुसार राज्यातील अनेक शिक्षक वैध अथवा अवैधमुळे अनुदानापासून वंचित राहणार आहेत. कारण, अजूनही पोर्टल सुरू नाही. सुरू झाले तरी ते संथ आहे. ज्या शाळांतील पट अगदी काठावर आहे, तेथील शिक्षकांनी काय करायचे, हे संबंधित अधिकारी आणि सर्व सात शिक्षक आमदारांना कसे कळाले नाही? हे सर्व आमदार युद्धात जिंकले, पण तहात हरले असल्याचे जगदाळे यांनी सांगितले. दरम्यान, शिक्षण आयुक्तांच्या पत्राच्या संदर्भानुसार आंदोलन स्थगित करण्याबाबतचे पत्र शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले.
.................................
आमच्या अनुदानावर घाला
आधार कार्डची संख्या ग्राह्य धरा. त्यावर आधारित संचमान्यता करून पदे देण्यात यावीत. त्यांना अनुदान सुरू करावे आणि नंतर वैध अथवा अवैध पाहावे, अशी आमची मागणी होती. मात्र, तसे झाले नाही. आता दहावीचे विद्यार्थी परीक्षा झाल्यावर निघून जातील, जर त्याच वर्गातील विद्यार्थी अवैध असतील, तर शिक्षक दोषी का? मग त्या विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवणार का? हा आमच्या अनुदानावर घाला असल्याचे जगदाळे यांनी सांगितले.
.................................