
आंतरविद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ तृतीय
91251
कोल्हापूर ः चंदीगड विद्यापीठ मोहाली (पंजाब) येथे अखिल भारतीय आंतरविद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धा झाली. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संघाने तृतीय क्रमांक मिळविला.
आंतरविद्यापीठ वेटलिफ्टिंगमध्ये
शिवाजी विद्यापीठ तिसरे
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः चंदीगड विद्यापीठ मोहाली (पंजाब) येथे ता १५ ते १८ मार्च दरम्यान अखिल भारतीय आंतरविद्यापीठ वेटलिफ्टिंग (पुरुष ) स्पर्धा झाली. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संघाने तृतीय क्रमांक मिळविला.
या स्पर्धेत देशातील विविध २०० विद्यापीठांतून सुमारे ७०० खेळाडूंनी सहभाग घेतला. शिवाजी विद्यापीठ संघातून १० खेळाडू विविध वजनीगटात सहभागी झाले. त्यातील ६७ किलो वजनीगटात तेजस जोंधळे याने २६९ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. ७३ किलो वजनीगटात अनिरुद्ध निपाणे याने २८० किलो वजन उचलून सातवा क्रमांक मिळविला. ९६ किलो वजनीगटात रितेश म्हैशाळे याने २८५ किलो वजन उचलून आठवा क्रमांक मिळविला. या तिघांची खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सांघिक कामगिरीच्या जोरावर १२७ गुणांसह शिवाजी विद्यापीठाला तृतीय क्रमांक मिळाला. संघाचे प्रशिक्षक व व्यवस्थापक म्हणून देवचंद कॉलेजचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. रविंद्र चव्हाण यांनी काम पाहिले. या विजयी संघाला कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र. कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. शरद बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले.