
आजरा ः तहसील बातमी
ajr262.jpg...
91506
आजरा ः येथे म्हाळसाकांत देसाई, विकास कोलते यांचा सत्कार करताना तहसीलदार विकास अहिर. यावेळी डी. डी. कोळी व अन्य.
................
म्हाळसाकांत देसाई, विकास कोलते आजऱ्यात रूजू
आजरा, ता. २६ ः येथील तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार पदावर म्हाळसाकांत देसाई, महसूल नायब तहसीलदार पदावर विकास कोलते रुजू झाले. तहसीलदार विकास अहिर यांनी त्यांचे स्वागत केले. येथील तहसील कार्यालयात श्री. देसाई व श्री. कोलते यांचा सत्कार झाला. चार-पाच वर्षं ही दोन पदे रिक्त होती. एकच नायब तहसीलदार तीन विभागांचा काम पाहत होते. कामाचा ताण असल्याने कामाचा वेळेत निपटारा होत नव्हता. त्यामुळे ही रिक्त पदे भरण्याची मागणी होत होती. देसाई व कोलते रूज झाल्याने प्रलंबित कामे गतीने होतील, अशी आशा तहसीलदार श्री. अहिर यांनी व्यक्त केली. यावेळी नायब तहसीलदार डी. डी. कोळी, पुरवठा अधिकारी मनोज दाभाडे, अव्वल कारकून अनंत चोले, दिलीप जाधव, संदेश बारापात्रे, महसूल सहाय्यक सुजाता कार्जीणेकर, सोनाली सुतार, तलाठी संघटनेचे अध्यक्ष समीर जाधव, उपाध्यक्ष शिवराज देसाई, सचिव अशोक कुंभार, अशोक देसाई यासह महसूल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.