
म्हाळसाकांत देसाई यांचा सत्कार
gad271.jpg
91649
गडहिंग्लज : बेळगुद्री कॉलनी व विजयनगर मित्रमंडळातर्फे म्हाळसाकांत देसाई यांचा सत्कार आप्पासाहेब बेळगुद्री यांनी केला. डॉ. एम. एस. बेळगुद्री, बसाप्पा आरबोळे, प्रा. शिवाजी होडगे आदी उपस्थित होते.
म्हाळसाकांत देसाई यांचा सत्कार
गडहिंग्लज : येथील बेळगुद्री कॉलनी व विजयनगर मित्रमंडळातर्फे म्हाळसाकांत देसाई यांचा सत्कार करण्यात आला. श्री. देसाई यांना नुकतीच निवासी नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती मिळाली आहे. त्याबद्दल हा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरीक आप्पासाहेब बेळगुद्री यांच्या हस्ते सत्कार झाला. विजयनगर मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रा. शिवाजी होडगे अध्यक्षस्थानी होते. डॉ. एम. एस. बेळगुद्री, प्रा. होडगे, कृष्णा नाईक यांची भाषणे झाली. बसाप्पा आरबोळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संतराम पाटील, रायाप्पा धनगर, रमेश चौगुले, डी. के. पाटील, दुंडाप्पा घुळाण्णावर, सुभाष गुरव, संजय वडर, डॉ. किरण हत्ती, नंदकुमार देसाई आदी उपस्थित होते. डॉ. संभाजी सावंत यांनी आभार मानले.
-------------------------------
gad272.jpg
91650
गोवा : नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन व इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटीतर्फे राजन दड्डीकर यांना रत्नमाला सावनूर यांनी पुरस्कार प्रदान करताना केला. संपतबापू पवार, अमरसिंह पाटील आदी उपस्थित होते.
राजन दड्डीकर यांना पुरस्कार प्रदान
गडहिंग्लज : येथील पंचायत समितीकडील विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) राजन दड्डीकर यांना आदर्श शासकीय कर्मचारी पुरस्काराने गौरवले. बेळगाव येथील नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन व इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटीतर्फे हा पुरस्कार दिला. गोवा हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या महाविद्यालयात पुरस्काराचे वितरण झाले. माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर यांच्याहस्ते पुरस्काराचे वितरण झाले. माजी खासदार अमरसिंह पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक महेश मेघन्नावर यांची प्रमुख उपस्थिती होती.