यंदाही पदवीधर होण्यात मुलींची आघाडी

यंदाही पदवीधर होण्यात मुलींची आघाडी

24353
91804
91806
91809
.....

यंदाही पदवीधर होण्यात मुलींची आघाडी
शिवाजी विद्यापीठाचा उद्या दीक्षान्त समारंभ; महेश बंडगर याला ‘राष्ट्रपती सुवर्णपदक’, सोहम जगताप याला ‘कुलपती सुवर्णपदक’

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः शिवाजी विद्यापीठाचा ५९ वा दीक्षान्त समारंभ केंद्रीय पद्धतीने बुधवारी (दि. २९) सकाळी पावणेबारा वाजता राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात होणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस, तर भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) कानपूरचे माजी संचालक पद्मश्री डॉ. संजय धांडे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख उपस्थित असणार आहेत. यंदा ३३७८५ मुली (विद्यार्थीनी) पदवी स्वीकारणार असून, त्यांनी आपली आघाडी कायम राखली. त्यांचे प्रमाण मुलांच्या एक टक्क्याने अधिक आहे.
या वर्षी महाविद्यालय पातळीवर केवळ पदवी प्रमाणपत्रांचे वितरण केले जाईल. कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन स्वरूपात दीक्षान्त समारंभ होणार आहे. क्रीडा, बौद्धिक व कलाक्षेत्र, एनसीसी., एनएएसमध्ये आदर्श ठरल्याबद्दल सावे (ता. सांगोला) येथील महेश माणिक बंडगर याला ‘राष्ट्रपती सुवर्णपदक’, तर किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथील सोहम तुकाराम जगताप याला कुलपती सुवर्णपदकाने गौरविण्यात येणार असल्याची माहिची कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. यंदा एकूण ६६,४५७ स्नातकांना पदवी प्रदान केली जाणार असून, त्यात ३३७८५ मुली, तर ३२६७२ मुले आहेत. प्रत्यक्ष उपस्थित राहून १६५९४ स्नातक पदवी घेतील. उर्वरित ४९८६३ जणांना पोस्टाने पदवी पाठविली जाणार असल्याचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले. या समारंभात १६ स्नातकांना पारितोषिके, तर ४६ जणांना पीएच.डी. पदवी प्रदान केली जाईल. यंदा पदवी प्राप्त स्नातकांमध्ये विद्यार्थिनींचा टक्का वाढल्याचे प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी सांगितले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, ‘एनएसएस’चे संचालक डॉ. तुकाराम चौगुले, डॉ. शिवाजी जाधव आदी उपस्थित होते.

चौकट
ग्रंथदिंडी, महोत्सव आज
दीक्षान्त समारंभानिमित्त उद्या, मंगळवारी सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडी-पालखी मिरवणूक कमला कॉलेज ते विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब सभागृह या मार्गावर काढण्यात येईल. ग्रंथमहोत्सवाचे उद्‌घाटन सकाळी १० वाजता कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते होईल. बुधवारी (ता. २९) दुपारी साडेतीन वाजता संगीत व नाट्यशास्त्र विभागातर्फे ‘जागर दुर्मिळ वाद्यांचा व भावतरंग’ सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याचे ग्रंथमहोत्सवाचे समन्वयक डॉ. डी. बी. सुतार यांनी सांगितले.

चौकट
पेपरलेस ‘दीक्षान्त’
या वर्षीच्या दीक्षान्त समारंभात पदवी स्वीकारणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज, शुल्क ऑनलाईन स्वरूपात घेण्यात आले. ही प्रक्रिया पूर्णतः पेपरलेस राबविली. पदवी प्रमाणपत्रात काही चुका असल्यास त्याबाबतची तक्रारही विद्यार्थ्यांना ऑनलाईन करता येणार असल्याचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले.
.....
ठळक चौकट
यंदाचे विद्याशाखानिहाय पदवीधर
विज्ञान व तंत्रज्ञान-२७५५०
वाणिज्य व व्यवस्थापन-२११५५
मानव्यविद्या-१५५३९
आंतरविद्याशाखीय-२२१३
पारितोषिक प्राप्त विद्यार्थी-१६०
पीएच.डी. प्राप्त विद्यार्थी-३००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com