चंदन, दुचाकी चोरट्यांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदन, दुचाकी चोरट्यांना अटक
चंदन, दुचाकी चोरट्यांना अटक

चंदन, दुचाकी चोरट्यांना अटक

sakal_logo
By

दुचाकी, चंदन चोरट्यांना अटक
‘स्थानिक गुन्हे अन्वेषण’ची कारवाई; पाच दुचाकी, तीन लाखाचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर, ता. २७ ः मुरगूड आणि गडहिंग्लज परिसरात दुचाकी आणि चंदनाची चोरी करणाऱ्या दोघांना आज स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. त्यांच्याकडून पाच दुचाकी आणि ७० किलो चंदनाच्या झाडाची लाकडे असा सुमारे साडे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सुनिल आण्णाप्पा माने (वय २८), सतीश आण्णापा तोडकर (वय २६, दोघे रा.शेंद्री, ता.गडहिंग्लज) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
दुचाकी चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिलेल्या सुचनेनुसार विशेष मोहिम राबवली जात आहे. या अंतर्गत चोरट्यांचा शोध घेताना स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस अंमलदार तुकाराम राजीगरे यांना चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी दोघे जण कंदलगाव कमानीजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला. आज दुपारी सुनिल आणि सतिश नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवरून आले. पोलिसांनी त्यांनी थांबवले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर सदरची दुचाकी चोरीची असल्याचे निदर्शनास आले. वाहनासह सुनिल आणि सतीश यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी मुरगूड येथून १ तर गडहिंग्लज येथून २ मोटर सायकलीची चोरी केल्याचे कबूल केले. या तीन मोटर सायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या. या दुचाकींच्या चोरीची फिर्याद गडहिंग्लज आणि मुरगूड पोलिस ठाण्यात दाखल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणला मिळाली. तसेच या दोघांनी आणखी २ दुचाकी चोरल्याचे सांगितले. या दोघांकडून चोरीच्या आणि गुन्ह्यात वापरलेल्या अशा एकूण ५ दुचाकी जप्त केल्या. या दोघांनी काही दिवसांपूर्वी गडहिंग्लज भागातून चंदनाचे लाकूड चोरल्याचेही समोर आले. त्यांनी सांगितलेल्या ठिकाणावरून ७० किलो वजनाचे चंदनाचे लाकूड ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, उपनिरीक्षक शेष मोरे, पोलिस अंमलदार सुनिल कवळेकर, वसंत पिंगळे, अजय वाडेकर, संदीप कुंभार, संजय हुंबे, संजय कुंभार यांच्यासर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या कर्मचाऱ्यांनी केली.