
श्रमसंस्कार शिबिराचा गावाला फायदा
jsp2920
92099
हेरवाड ः येथे उपसरपंच सचिन पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य बाहुबली माणगांवे आदी उपस्थित होते.
श्रमसंस्कार शिबिराचा गावाला फायदा
सचिन पाटील; शरद कृषीच्या राष्ट्रीय सेवा शिबिराची सांगता
दानोळी, ता. २९ ः श्रम संस्कार शिबिरात विद्यार्थ्यांनी व शरद कृषी महाविद्यालयाने गावातील शेतकऱ्यांसाठी जे शेतीविषयक व्याख्याने आयोजित केली होती त्यातून शेतकऱ्यांना फायदेशीर गोष्टींचे ज्ञान व विविध योजनांची माहिती मिळाली. त्याचा गावाला भविष्यात फायदा होईल, असे प्रतिपादन उपसरपंच सचिन पाटील यांनी अध्यक्षस्थानावरुन केले.
ते हेरवाड येथे शरद कृषि महाविद्यालय, जैनापूरच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रिय सेवा योजनेअंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबीराच्या सांगता समारंभात बोलत होते. प्रमुख पाहूणे प्राचार्य डॉ. बाहुबली माणगावे होते. यावेळी शिबिरार्थी व संयोजकांना प्रमाणपत्रांचे वाटप केले. शिबिरासाठी विशेष सहकार्य व सेवा पुरवणाऱ्या ग्रामस्थांचा महाविद्यालयामार्फत सत्कार केला. शिबिरासाठी संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. दादासाहेब मगदूम यांनी परिश्रम घेतले.
शिबीर समारोप प्रास्ताविकामध्ये डॉ. सोनम सुर्यवंशी यांनी सात दिवस राबवलेल्या विविध उपक्रमांचा आढावा, मिळालेला प्रतिसाद व शिबिरार्थीना मिळालेले सहकार्य यांचे विश्लेषण केले. डॉ. रमेश कोळी यांनी आभार मानले.