घरेलु कामगार महिलांना मिळणार १० हजार सन्माननिधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरेलु कामगार महिलांना मिळणार १० हजार सन्माननिधी
घरेलु कामगार महिलांना मिळणार १० हजार सन्माननिधी

घरेलु कामगार महिलांना मिळणार १० हजार सन्माननिधी

sakal_logo
By

घरेलू कामगार महिलांना
१० हजार सन्मान निधी
प्रशासनाच्या पातळीवर प्रक्रिया सुरू
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ ः घरेलू कामगार महिलांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे १० हजार रुपये सन्मान निधी दिला जाणार आहे. याची प्रक्रिया प्रशासनाच्या पातळीवर सुरू झाली आहे. ज्या घरेलू कामगार महिलांची नोंदणी झालेली आहे आणि ज्या महिलेची वयाची ५५ वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा महिलांच्या बँक खात्यावर ही रक्कम डीबीटीद्वारे जमा केली जाणार आहे.
कोरोना संसर्गाच्या काळात घरेलू कामगारांची आर्थिक परिस्थिती अतिशय दयनीय बनली होती. त्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने घरेलू कामगार महिलांची नोंदणी करण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. यामध्ये जिल्ह्यातील घरेलू मोलकरणींनी कल्याण मंडळाकडे नोंदणी केली होती. घरेलू कामगार महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत व ज्या अंग मेहनती काम करणाऱ्या घटकांमध्ये समाविष्ट होत्या त्यांना आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी सन्मान योजना २०२२ पासून राबविण्यात येणार होती. २०२२ पूर्वीच त्यांना मदत मिळेल, असे आश्वासनही शासनाने दिले होते; मात्र २०२३ उजाडले तरीही ही मदत या महिलांना मिळालेली नाही. सध्या घरेलू मोलकरणींना १० हजार रुपयांचा सन्मान निधी देण्यासाठी प्रशासन पातळीवर मोठ्या हालचाली सुरू आहेत. यातील पात्र लाभार्थ्यांना संपर्क साधून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवली जात आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ५५ वर्षे पूर्ण झालेल्या हजारो घरेलू मोलकरणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम वर्ग केली जाणार आहे.
------
कोट
गेल्या वर्षी घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे मोलकरणींची नोंदणी करण्यात आली होती. त्यांना १० हजार सन्मान निधी देऊ, असे आश्वासनही त्यावेळी दिले होते. याबाबतचा शासन निर्णय झाला असून जिल्ह्यातील हजारो घरेलू मोलकरणींना याचा लाभ मिळणार आहे.
- सुशीला यादव, घरेलू कामगार संघटना.