भरड धान्यावर व्याख्यान

भरड धान्यावर व्याख्यान

ich24.jpg
93007
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयात भरड धान्य विषयावरील आयोजीत व्याख्यानात डॉ. सुभाष इंगळे यांचे स्वागत प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी केले.
भरड धान्यावर व्याख्यान
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयात भरड धान्य सर्वोत्कृष्ट सकस आहार या विषयावर व्याख्यान झाले. प्रमुख वक्ते डॉ. सुभाष इंगळे यांनी मार्गदर्शन केले. अनेक धान्याच्या अतिवापरामुळे जीवघेणे आजार वाढत चालले आहेत. आपला दैनंदिन आहार बदलून भरड धान्याचा वापर केल्यास आरोग्य सदृढ राहू शकते. भरड धान्याचे लोप पावत चाललेले प्रमाण वाढवल्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अनिल पाटील होते. प्रास्ताविक डॉ. संजय सुतार यांनी केले. आभार उपप्राचार्य डी. ए. यादव यांनी मानले. सुत्रसंचालन प्रा. भारती कोळेकर यांनी केले. डॉ. डी. सी. कांबळे, डॉ. सुनिता वेल्हाळ, डॉ. प्रभा पाटील, डॉ. विनायक गाणबावले, डॉ. सागर सुतार, डॉ. पद्मश्री वाघमारे उपस्थित होते.
----------
ich25.jpg
93008
इचलकरंजी : कन्या महाविद्यालयात संविधान संवाद कार्यशाळेत बोलताना अमोल पाटील.
कन्या महाविद्यालयात संविधान संवाद कार्यशाळा
इचलकरंजी : श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात एकदिवसीय संविधान संवाद कार्यशाळा झाली. महाविद्यालयाचे समान संधी केंद्र, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र राधानगरी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन केले. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमधील प्रत्येक शब्दाच्या अर्थातून प्रतिष्ठा जपली पाहिजे. तरच आपण उत्तम नागरिक बनू शकतो, असे मत संवादक अमोल पाटील यांनी व्यक्त केले. पूजा धोत्रे, स्नेहल माळी यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. त्रिशला कदम होत्या. प्रास्ताविक कॅप्टन प्रा. प्रमिला सुर्वे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. मनीषा गवळी यांनी केले.
-----------
ich26.jpg
93009
इचलकरंजी : नाईट कॉलेजमध्ये पारंपारिक दिन झाला.
नाईट कॉलेजमध्ये पारंपारिक दिन
इचलकरंजी : नाईट कॉलेजमध्ये सांस्कृतिक विभागातर्फे पारंपारिक दिनाचे आयोजन केले. प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी पारंपारिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभुषा परिधान करत सहभाग नोंदवला. विविध राज्यांचा पोशाख धारण करून भारतीय संस्कृतीची विविधतेतील एकता यानिमित्ताने दाखवली. दाक्षिणात्य पोषाख व अस्सल मराठमोळा पोशाख आकर्षणाचा बिंदू ठरला. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. एफ. एन. पटेल, प्रा. सौरभ पाटणकर, डॉ. प्रवीण पवार यांनी केले. डॉ. माधव मुंडकर, डॉ. रवीकिरण कोरे, डॉ. गणेश खांडेकर, डॉ. रामेश्‍वर सपकाळ, डॉ. सचिन चव्हाण, डॉ. जीवन पाटील, प्रा. अभिजीत पाटील, प्रा. प्रमोद काळे आदी उपस्थित होते.
----------
़''आंतरभारती’ जोशी यांचा स्मृतिदिन
इचलकरंजी : आंतरभारती विद्यालयात एस. एम. जोशी यांचा स्मृतिदिन झाला. एस. व्ही. नेवसे यांच्याहस्ते एस. एम. जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख एन. बी. कुंभार यांनी एस. एम. जोशी यांच्या जीवनकार्याची ओळख करून दिली. नववीच्या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षक टी. ए. बुबनाळे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथालयास पुस्तके भेट दिली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एम. डी. पाटील होते. आर. बी. परीट यांनी आभार मानले. पर्यवेक्षिका व्ही. सी. फाटक आदी उपस्थित होते.
---------
अभिनव का अभिनंदन चित्रपटाबाबत माहिती
इचलकरंजी : रोटरी डेफ स्कुल तिळवणी येथे दिव्यांग मुलांना प्रेरणा देण्यासाठी अभिनव का अभिनंदन या चित्रपटाबाबत माहिती दिली. दातार अभिनव फिल्म क्रिएशन मुंबई यांनी दिव्यांग मुलांना प्रेरणा मिळावी, प्रोत्साहन मिळावे यासाठी हा चित्रपट काढला आहे. चित्रपटाचे अनावरण दिव्यांग विद्यार्थ्यांनी केले. स्वागत संस्थेचे अध्यक्ष डी. एम. कस्तुरे यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका स्मिता रणदिवे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com