शब्दसुरांच्या सरीत रसिक चिंब!

शब्दसुरांच्या सरीत रसिक चिंब!

gad108.jpg
94850
गडहिंग्लज : सकाळ माध्यम समुह व टाटा तनिष्क ज्वेलर्सतर्फे आयोजित सुवर्णक्षण कार्यक्रम सादर करताना कलाकार. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
----------------------------------
gad109.jpg
94851
गडहिंग्लज : सकाळ माध्यम समुह व टाटा तनिष्क ज्वेलर्सतर्फे आयोजित सुवर्णक्षण कार्यक्रमाला रसिक उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
---------------------------------------
GAD1010.JPG (फोटो बातमीत )
94895
गडहिंग्लज : ‘सकाळ’तर्फे टाटा तनिष्कचे संचालक प्रसाद व जय कामत यांचा सत्कार वरिष्ठ व्यवस्थापक (वितरण) महेश डाकरे यांनी केला.
-------------
शब्दसुरांच्या सरीत रसिक चिंब!
गडहिंग्लजकरांनी अनुभवला ‘सुवर्णक्षण’; सकाळ-टाटा तनिष्क ज्वेलर्सतर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : दोन-तीन दिवस वळीवाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यांनी विश्रांती घेतली अन् शब्दसुरांच्या सरी कोसळू लागल्या. यात गडहिंग्लजचे रसिक अक्षरश: चिंब झाले. सायंकाळच्या आल्हाददायक वातावरणात उमटलेल्या सुमधुर स्वरांना तितक्याच तोलामोलाची संगीत साथ मिळाली. गडहिंग्लजकरांसाठी हा ''सुवर्णक्षण'' दिर्घकाळ स्मरणात राहणार ठरला. निमित्त होते, सकाळ माध्यम समुहाची सांस्कृतिक प्रबोधिनी आणि टाटा तनिष्क ज्वेलर्सतर्फे आयोजित हिंदी-मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे.
येथील सूर्या सांस्कृतिक भवनमध्ये रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हा कार्यक्रम झाला. गणेश गीताने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर सादर केलेल्या सूर निरागस हो... या गीताने सूर किती निरागस असतात याची प्रचिती रसिकांना आली. त्यानंतर आई अंबाबाई..., अबीर गुलाल... अशी भक्तीगीते सादर झाली. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या... हे गीत सादर झाले असले तरी प्रत्यक्षात मैफिल गडहिंग्लजकर रसिक श्रोत्यांनी चांगलीच सजली होती. एक हौस पुरवा... या लावणीला चांगलीच दाद मिळाली. एकापेक्षा एक गीतांचा नजराना रसिकांना मंत्रमुग्ध करणारा ठरला. हर घडी बदल रही है... या गीताने कार्यक्रमाची सांगता होईपर्यंत दोन-अडीच तास कधी संपले याचे भान उरलेच नाही.
कोल्हापूरचे महागायक महेश हिरेमठ, गायिका शुभांगी जोशी, रसिरा झावरे यांच्या सुमधुर आवाजाला रसिकांची दाद मिळाली. सुनील गुरव (किबोर्ड), भूषण साटम (गिटार), राजू आवटी (तबला), महेश कदम (आर्कोपॅड) यांनी संगीत साथ दिली. सतीश कुलकर्णी यांच्या अभ्यासपूर्ण आणि दमदार आवाजातील निवेदनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. गाण्यांना दाद मिळतच होती पण, रसिकांनी अनेकदा निवेदनावरही टाळ्यांची बरसात केली, हे विशेष. श्रीधर जाधव यांनी ध्वनी यंत्रणा सांभाळली.
तत्पूर्वी, गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर, माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, मंजुषा कदम, माजी उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, माजी नगरसेविका श्रद्धा शिंत्रे, टाटा तनिष्कचे संचालक प्रसाद कामत व जय कामत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. ‘सकाळ’चे वरिष्ठ व्यवस्थापक (वितरण) महेश डाकरे, व्यवस्थापक (इव्हेंट) सुरज जमादार, सहायक व्यवस्थापक (जाहिरात) अरुण भोगले, सिनिअर एक्झिक्युटीव्ह प्रवीण अडसुळे आदी उपस्थित होते. बातमीदार दीपक कुपन्नावर यांनी सूत्रसंचालन केले.
--------------
उल्लेखनीय काम केलेल्या महिलांचा सन्मान
विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या महिलांचा सन्मान केला. तलवारबाजीत नावलौकिक मिळवलेली खेळाडू अनुजा धबाले (गडहिंग्लज), बचत गट चळवळीत कार्यरत असणाऱ्या अंजुम नूलकर (नेसरी), दुर्गम धनगरवाड्यावर आरोग्य सेवा पुरविणाऱ्या दीपाली गोविलकर, रेखा दोरुगडे, मंदाकिनी कोडक (पेरणोली) या आरोग्य कर्मचाऱ्यांना टाटा तनिष्क ज्वेलर्सतर्फे भेटवस्तू देऊन गौरवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com