मोरीच्या दूरवस्थेकडे दूर्लक्ष

मोरीच्या दूरवस्थेकडे दूर्लक्ष

chd103.jpg
94854
इसापूर ः केगदवाडी दरम्यानच्या रस्त्यावरील तीन वर्षापूर्वी मोरी वाहून गेली.
------------------------------------
मोरीच्या दूरवस्थेकडे दूर्लक्ष
इसापूर- केगदवाडी मार्ग; तीन वर्षापूर्वीची घटना
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १० ः इसापूर- केगदवाडी दरम्यान बांधलेली मोरी तीन वर्षापूर्वी अतिवृष्टीने वाहून गेली. सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील तळकट, कुंभवडे, चंदगड तालुक्यातील इसापूर, पारगड परीसरातील नागरीकांना चौकुळ, आंबोली तसेच सावंतवाडीला जाण्यासाठी चंदगडमार्गे पन्नास किलो मीटरचा फेरा घालावा लागत आहे.
कोकणातील आंबोली, चंदगड तालुक्यातील पारगड आणि तिलारीनगर हा त्रिकोणी पट्टा जोडून पर्यटन विकास साधायचा म्हणून तत्कालीन आमदार कै. बाबासाहेब कुपेकर यांनी या रस्त्याचा प्रस्ताव दिला. काही जागा वन विभागाच्या हद्दीतून जात असल्याने रस्त्याचे काम पूर्ण होण्यास विलंब लागला. मात्र शासकीय सोपस्कार पूर्ण करुन हा रस्ता तयार झाला. त्यामुळे कोकणातील सावंतवाडी, दोडामार्ग आणि चंदगड तालुक्याचे अंतर कमी झाले. पारगड, इसापूर, तळकट, कुंभवडे, चौकुळ, आंबोली, सावंतवाडी, दोडामार्ग परीसरातील नागरीकांचे नातेसंबंध असल्यामुळे त्यांच्यासाही हा रस्ता सोयीचा ठरला. या भागातील नागरीकांना कोल्हापूरला जाण्यासाठीही आंबोलीमार्गे अंतर कमी झाले. मात्र तीन वर्षापूर्वी झालेल्या अतिवृष्टीने केगदवाडी नजीकची मोरी वाहून गेली. तिची अद्याप दुरुस्ती नाही. रस्ताही खचला आहे. तात्पुरती डागडुजी करुन वाहतूक सुरु असली तरी ती धोकादायक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने मोरीची व रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com