मधुमेह निदानासाठी गुरूवारपासून मोफत शिबिर

मधुमेह निदानासाठी गुरूवारपासून मोफत शिबिर

मधुमेहाच्या निदानासाठी
गुरुवारपासून मोफत तपासणी

कोल्हापूर ः भारतातील साडेआठ टक्के लोकांना मधुमेह आहे. त्यांपैकी पन्नास टक्के लोकांना मधुमेह आहे याची कल्पनाही नसते. लवकर निदान न झाल्यास संबंधित व्यक्तीला त्याच्या दीर्घकाळ विपरीत परिणामांना सामोरे जावे लागू शकते. त्याउलट वेळेत व लवकर निदान झाल्यास मधुमेहाचे महागडे उपचार आणि जीवघेण्या गुंतागुंतीपासून त्याचा बचाव होऊ शकतो. म्हणूनच स्थूलत्व आणि मधुमेहमुक्त विश्व अभियानाचे प्रणेते डॉ. जगन्नाथ दीक्षित संचालित येथील अडोर ट्रस्ट, डायबेटिस रिव्हर्सल सेंटरच्या वतीने मोफत ‘एचबीएवनसी’ तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. गुरुवारी (ता. १३) या शिबिराला प्रारंभ होणार असून, वीस एप्रिलपर्यंत सकाळी ८ ते ११ या वेळेत मंगलधाम हॉल (बिनखांबी गणेश मंदिरजवळ) येथे शिबिर होणार आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर डायबेटिस रिव्हर्सल सेंटरचे प्रमुख अजय खतकर यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com