सत्यजित जाधव यांची निवड

सत्यजित जाधव यांची निवड

94964

काँग्रेस औद्योगिक सेल प्रदेश सचिवपदी
युवा उद्योजक सत्यजित जाधव
कोल्हापूर, ता. १० - राष्ट्रीय काँग्रेस औद्योगिक सेलच्या प्रदेश सचिवपदी युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव यांची निवड झाली. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्या हस्ते त्यांनी निवडीचे पत्र स्वीकारले.
दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचे ते पुत्र आहेत. याचबरोबर ते कैलासगडची स्वारी मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष व रावणेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (गोशिमा) संचालक व रोटरी क्लबचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
कोल्हापुरातील औद्योगिक समस्या सत्यजित जाधव सातत्याने शासनदरबारी मांडत आहेत. याची दखल घेत गटनेते पाटील यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या औद्योगिक सेलकडे त्यांची शिफारस केली. यानुसार औद्योगिक सेलचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोनारे यांनी राष्ट्रीय काँग्रेस औद्योगिक सेलच्या सचिवपदी सत्यजित जाधव यांची निवड केली.
कोल्हापुरात लॉजीस्टीक पार्क उभारण्यासठी एमआयडीसीने पुढाकार घेतला होता. लॉजीस्टीक पार्क उभारण्याचे काम लवकर सुरु करावे. औद्योगिक कचऱ्याची योग्यरीतीने विल्हेवाट लावण्यासाठी जागा निश्चित करण्यात यावी. या प्रश्नांसाठी प्राधान्याने पुढाकार घेणार असल्याचे सत्यजित जाधव यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com