पावणे दोन कोटींची 
व्हेलची उलटी जप्त

पावणे दोन कोटींची व्हेलची उलटी जप्त

९४९८३
कोल्हापूर ः येथे सोमवारी पोलिसांनी कारवाई करीत दोघांकडून जप्त केलेली व्हेल माशाची उलटी.

पावणे दोन कोटींची
व्हेलची उलटी जप्त
कोल्हापूरच्या तरुणासह दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : शहरात आज पोलिसांनी कारवाई करीत एक कोटी ८० लाख रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी जप्त केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. आज दुपारी सापळा रचून दसरा चौकात ही कारवाई करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्रीसाठी घेऊन आलेल्या बेळगावसह कोल्हापुरातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. माधव विलास सूर्यवंशी (वय ३८, रा. बेडकीहाळ, ता. निपाणी) आणि अविनाश सुभाष खाबडे (३२, रा. लिशा हॉटेल, कोल्हापूर) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी मोबाइल हँडसेटही जप्त केला.
व्हेल माशाच्या उलटीसदृश वस्तूची विक्री करण्यासाठी दोन तरुण कोल्हापुरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार दसरा चौकात संशयितरीत्या फिरणारे माधव सूर्यवंशी आणि अविनाश खाबडे यांना ताब्यात घेतले. दोघांकडे कसून चौकशी केल्यानंतर ते व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी आल्याचे स्पष्ट झाले. उपनिरीक्षक शेष मोरे, विनायक सपाटे, प्रकाश पाटील, हरीष पाटील, राजेश राठोडे, शिवानंद मठपती, संजय पडवळ, संतोष पाटील, रफिक आवळकर यांच्यासह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.
व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यास बंदी आहे. त्यामुळे त्याची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे उघड होत आहे. अलीकडे वर्षभरात कोल्हापूरसह सांगली, सिंधुदुर्ग येथे यासंदर्भात पोलिसांकडून कारवाई होत आहे.

तस्करीमागे रॅकेट?
व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यास बंदी आहे. त्याची विक्री कोठे होणार होती, त्यामागे रॅकेट कार्यरत आहे काय, याची माहिती पोलिसांकडून घेण्याचे काम सुरू असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com