डॉ. आंबेडकर जयंती पत्रके

डॉ. आंबेडकर जयंती पत्रके

१३२ वी जयंतीनिमित्त शहरात संस्था, संघटना विविध उपक्रम
-
डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना अभिवादन

कोल्हापूर, ता. १४ : आधुनिक भारताचे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मानवमुक्तीचे प्रणेते, क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांची १३२ वी जयंती विविध उपक्रमांनी झाली. शहरातील विविध संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालये, तरुण मंडळांनी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले.
...
महत्‍वाच्या चौकटी
मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीतर्फे
होणारे कार्यक्रम पुढे ढकलले
कोल्हापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने उद्या (ता. १५) आणि १६ ला होणारे सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीतर्फे डॉ. आंबेडकर यांची जयंती विविध कार्यक्रमांनी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. याहीवर्षी ११ ते १६ एप्रिलपर्यंत विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत; परंतु रिपब्लीकन पक्षाचे संघटक सचिव आणि आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते बी. के. कांबळे यांचे ज्येष्ठ चिरंजीव गिरीष बळवंत कांबळे यांचे निधन झाले. त्यामुळे १६ रोजी होणारे सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत याची नोंद घ्यावी, असे समितीचे सचिव जयसिंग पाडळीकर यांनी प्रसिध्द पत्रकाद्वारे कळवले आहे.
...
भीम फेस्टीव्हलमधील कार्यक्रमांचा समारोप
कोल्हापूर : एस. के. डिगे मेमोरियल फाउंडेशनतर्फे आयोजित भीम फेस्टीव्हलमधील विविध कार्यक्रमांचा आज समारोप झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजन केले होते. सकाळी मंदिरांच्या बाजूला असलेल्या गरीब, निराश्रीतांना फळांचे वाटप केले. गरीब मुलांना भोजनदान दिले. फाउंडेशनचे अध्यक्ष सदानंद डिगे यांनी कार्यक्रमांचे नियोजन केले. प्रभाकर कांबळे, योगेश डिगे, विकास डिगे, अशोक भास्कर, डि. के. कांबळे, श्री. म्हारुळकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बिंदू चौकात डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी विविध संस्था, संघटनातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पूर्ण बिंदू चौकात भीममय वातावरण निर्माण झाले. बुद्धवंदना झाली. विशेष म्हणजे, डिगे फाउंडेशनतर्फे उभा केलेल्या क्रांतीबा फुले वाड्याच्या समोरील सेल्फी पॉईंटमधून अनेकांनी फोटो घेतले.
...
लंडन येथील निवासस्थानीअभिवादन
डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लंडन इथे असलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या निवासस्थानी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी भेट देऊन अभिवादन केले. श्री. क्षीरसागर म्हणाले, ‘भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. आंबेडकर हे १९२१-२२ दरम्यान लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे शिक्षण घेत होते. या कालावधीत बाबासाहेबांनी लंडनमधील किंग हेनरी रोड येथील एका घरात वास्तव्य केले होते. ती ही वास्तू असून, इथे महामानवाला अभिवादन करून नतमस्तक झालो. ही भेट संस्मरणीय आणि खूप ऊर्जा देणारी ठरली.’
---------------------------
जिल्‍हा परिषद
कोल्‍हापूर : माणसाला केवळ स्वतः पुरता विचार करुन आनंद मिळत नाही तर दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. दुसऱ्याला आपल्या आनंदात सहभागी करून घेतले तरच आपणही आनंदी होतो. आपला आनंद द्विगुणित होतो, असे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांनी सांगितले.
चंबुखडी येथील मातोश्री वृद्धाश्रमात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा परिषदेकडून या आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. समाज कल्याण उपायुक्त उमेश घुले, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे, सूर्यकांत माचरे, समाज कल्याण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
----
वसंतराव नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय
प्राचार्य डॉ. शिवाजी पाटील यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रा. धनंजय चाफोडीकर अध्यक्षस्थानी होते. कमलाकर गुरव यांनी प्रास्ताविक केले. संतोष मिसाळ यांनी आभार मानले.
...
रमण मळा
रमणमळा जयंती उत्सव समिती, भागातील तरुण मंडळाचे कार्येकर्ते, नागरिकांनी येथील डॉ. आंबेडकर चौकात धम्मध्वज उभा केला. बुध्द वंदना गात डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास फुले वाहुन अभिवादन केले. उत्सव समितीने आंबेडकर चौकामध्ये आकर्षक विद्युतरोषणाई केली. सजावट करुन भागातील विविध ठिकाणी वृक्षारोपण, साखर वाटप केले. भागातील अनेक कुटुंबांनी घरावर निळे झेंडे लावले. घरामध्ये गोड जेवण केले. उत्सव समितीतर्फे शनिवारी सायंकाळी बुद्ध आणि भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे. माजी आमदार मालोजीराजे, माजी नगरसेवक राजाराम गायकवाड, विनोद शिराळे, संदीप सरनाईक, अरुण माळगे, रवि जानकर, अनिल अदिक, अमोल खाबडे, प्रशांत जाधव, अमित सुळगावकर, विष्णूपंत पोवार, महिपती कांबळे, विशाल कांबळे, मसु कांबळे, राजु नालबंद उपस्थित होत्या.
...
इंदिरा गांधी विद्यानिकेतन
मुख्याध्यापिका एम. आर. मोहिते-पाटील अध्यक्षस्थानी होत्या. सहायक शिक्षक के. एन. सुतार यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार सांगितले. श्रुती कांबळे हिने डॉ. आंबेडकर यांच्याविषयी कविता सादर केली. एम. एस. वेदांते यांनी सूत्रसंचलन केले. बी. एम. खाडे यांनी आभार मानले.
...
बहुजन माध्यमिक शिक्षक
व सेवक पतसंस्था

डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन आणि दिपप्रज्वलन अध्यक्ष अनिल चव्हाण यांच्या हस्ते झाले. सर्व संचालक, उपस्थितांनी बुध्दवंदना केली. संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस योगेश वराळे, छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेस दत्तात्रय टिपुगडे, महात्मा फुले यांच्या प्रतिमेस विलास दुर्गाडे, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस संजय कांबळे, छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस रविंद्र मोरे, डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस संस्था वसुली अधिकारी समीर कळके, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस व्यवस्थापक बाबुराव साळोखे यांनी पुष्पहार अर्पण केले. संस्थाध्यक्ष रघुनाथ मांडरे, उपाध्यक्ष विकास कांबळे, सदस्य राहुल माणगांवकर, संचालक प्रकाश पोवार, नंदकुमार कांबळे, दिलीप वायदंडे, रघुनाथ कांबळे, बापू कांबळे, सुजाता भास्कर, सुजाता देसाई, आण्णा पाटील उपस्थित होते.
...
जिल्हा खादी ग्रामोद्योग संघ
जिल्हा स्वातंत्र्य सैनिक वारस संघटनेतर्फे कार्यक्रम झाला. प्राचार्य व्ही. डी. माने, अध्यक्ष सुंदरराव देसाई, प्रा. सदाशिव मनुगडे, प्रा. सुजय देसाई, संचालिका सविता देसाई, गीता गुरव, उपाध्यक्ष प्रकाश चौगुले, दादासो जगताप, सखाराम सुतार, विष्णुपंत अंबपकर यांनी डॉ. बाबासाहेबांच्या कार्याची आणि संविधानाची माहिती दिली. उपाध्यक्ष प्रकाश चौगुले यांनी आभार मानले.
...
विद्यापीठ हायस्कूल
मुख्याध्यापक एस. वाय. कुंभार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाल्यानंतर ए. ए. निंबाळकर यांनी डॉ. आंबेडकरांचे कार्य सांगितले. उपमुख्याध्यापिका एस. व्ही. रणनवरे, ज्युनिअर कॉलेजच्या उपप्राचार्य के. व्ही. भानुसे, पर्यवेक्षक बी. डी. गोसावी, एच. एम. गुळवणी उपस्थित होते.
...
श्रीदत्ताबाळ मिशन डिव्हाईन
श्रीदत्ताबाळ प्राथमिक विद्या मंदिर, श्रीदत्ताबाळ हायस्कूल, श्री दत्ताबाळ शिशुविहारतर्फे कार्यक्रम झाला. सचिव निलेश देसाई यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. अध्यक्षा पल्लवी देसाई, विश्वस्त वेद देसाई, व्यवस्थापक संदीप डोंगरे, मुख्याध्यापिका रोहिणी शेवाळे, प्रणिता वर्धमाने, हायस्कूलचे मुख्याध्यापक सचिन डवंग उपस्थित होते.
...
लोहिया हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज
प्राचार्य एस. एस. चव्हाण अध्यक्षस्थानी होते. वक्ते प्रा. विक्रमसिंह पाटील, प्रा. दिलीप पाटील यांच्या हस्ते डॉ. आंबडेकरांच्या प्रतिमेचे पूजन झाले. पर्यवेक्षिका एस. बी. पाटील उपस्थित होत्या. एस. एस. मिराशी यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षिका पाटील यांनी आभार मानले.
...
गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालय
प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. डॉ. सी. पी. कुरणे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. प्रा. पी. बी. झावरे यांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनकार्यावरील चित्रफीत सादर केली. प्राचार्य डॉ. भुयेकर यांनी मनोगत व्यक्त केले. उपप्राचार्य एस. एच. पिसाळ, पर्यवेक्षक एस. एन. मोरे, रजिस्टार व्ही. एस. जौंदाळ, प्रा. एस. एन. बोरवडेकर, डॉ. एम. के. पोवार, प्रा. एस. जी. राक्षसे, प्रा. एम. एम. कांबळे उपस्थित होते. प्रा. जयकुमार देसाई, डॉ. मंजिरी मोरे, दौलत देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. आर. एम. बिसुरे यांनी आभार मानले.
...
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई)
पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष भाऊसाहेब काळे यांच्या हस्ते बिंदू चौक येथे डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. महात्मा जोतीबा फुले यांच्या प्रतिमेस उपाध्यक्ष रंगराज जि. यांनी पुष्पहार अर्पण केला. सिंध्दात देशमूख, तिलोत्तमा देशमुख, बाजीराव गायकवाड, सात्ताप्पा कांबळे, प्रकाश माने, अशोक घाडगे, अजित देर्लेकर, शोभा कोमटे उपस्थित होते.
...
मिलिंद हायस्कूल
मुख्याध्यापक एम. एम. शिर्के अध्यक्षस्थानी होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख बी. ए. नदाफ यांनी प्रास्ताविक केले. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
...
महाद्वार रोड व्यापारी रहिवासी असोसिएशन
अध्यक्ष शामराव जोशी यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सचिव डॉ. गुरुदत्त म्हाडगुत, संचालक शिवनाथ पावसकर, अमित माने, योगेश पोवार, सागर कदम, किरण लाटकर, राकेश माने, अविनाश टकळे यांच्यासह व्यापारी आणि रहिवासी उपस्थित होते.
...
शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समिती
विद्यार्थी सहाय्यता केंद्र, सायबर चौक येथे कार्यक्रम झाला. युवा उद्योजक योगेश पाटणकर (मुंबई) यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शाहीरविशारद डॉ. आझाद नायकवडी यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर विचार मांडले. आजी माजी विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष डॉ. प्रवीण कोडोलीकर, धैर्यशील यादव, ऋतुराज माने, शशिकांत हुक्किरे, सुभाष संपकाळ, प्रा. महेश साळुंखे, अस्मिता जोशी, डॉ. प्रियांका धनवडे, महेश राठोड उपस्थित होते.
...
प्रायव्हेट हायस्कूल
मुख्याध्यापिका व्ही. एल. डेळेकर, उपमुख्याध्यापक जी. एस. जांभळीकर, पर्यवेक्षक पी. एम. जोशी, ज्येष्ठ शिक्षक व्ही. के. शिंदे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. जे. एस. जोशी यांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली.
.....
शहाजी महाविद्यालय
प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, स्टाफ सचिव डॉ. आर. डी. मांडणीकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले. डॉ. आंबेडकर यांचे आर्थिक विचार या विषयावर अर्थशास्त्र विभागातील प्रा. डॉ. डी. पी. गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. आंबेडकर यांच्या विषयी ग्रंथालयात असलेल्या विविध ग्रंथांचे प्रदर्शन झाले. ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील यांनी आभार मानले.
...
संयुक्त महाराष्ट्र हौसिंग सोसायटी ग्रंथालय
राजेंद्र वालेकर, ग्रंथालयचे अध्यक्ष अभय मिराशी, कोषाध्यक्ष मंगला कुलकर्णी, संचालिका डॉ. जुई कुलकर्णी, ग्रंथपाल सौ. प्रणिता खोत, गुरूनाथ हेर्लेकर आदी उपस्थित होते.
...
आम आदमी पार्टी
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई म्हणाले, ‘‘भारतातील लाखो, करोडो बंधू-भगिनींना सन्मानाने जगता यावे, यासाठी अहोरात्र अभ्यास, चिंतन करून ज्या महामानवाने संपूर्ण कष्टकरी, वंचित, अज्ञानी लोकांना अभिमानाने जगण्याचा अधिकार दिला. अन्यायाची आणि गुलामीचीन जाणीव करून त्याविरुद्ध लढा देण्याची हिंमत, ताकद दिली. या देशातील जाती व्यवस्थे विरोधात बंड करून समस्त मानवजातीला समान कायद्याचा अधिकार दिला.’’
...
वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर शहर
कोल्हापूर महापालिका येथे डॉ. आंबेडकर यांची जयंती साजरी केली. वंचित बहुजन आघाडीचे निरिक्षक अतुल बहुले, महासचिव सिद्धार्थ कांबळे, कोषाध्यक्ष प्रकाश कांबळे, शहराध्यक्ष मिलिंद पोवार, महासचिव मल्हार शिर्के, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त शिल्पा दरेकर, उपायुक्त रविकांत आडसुळे, नारायण भोसले, अमित सातारकर, एस.पी. कांबळे, महादेव कोल्हे, शासकीय कर्मचारी उपस्थित होते.
...
प्रहार प्रतिष्ठान शिवाजी पेठ
अध्यक्ष चंद्रकांत यादव, चंद्रकांत सुर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. नागरिकांनी राज्य घटनेची शपथ घेतली. अमर सावंत, मोहसीन मेस्त्री, चंद्रकांत खोंद्रे, शंकरराव चौगुले, महादेव काटकर, अमर कोरोणे, संजय निकम, भिमराव बोडके, भरत जाधव, संजय चौगुले, विकास जाधव, बाळु कुरणे आदी उपस्थित होते.
...
प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा
महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय रजपूतवाडी
वसंत लिंगनूरकर, व्यंकाप्पा भोसले उपस्थित होते. रजपूतवाडी, सोनतळी गावांमध्ये प्रभातफेरी काढली. विद्यार्थी, विद्यार्थीनींनी मनोगत व्यक्त केले. संस्था कार्यवाह प्रा. सुनील भोसले, संस्था सहकार्यवाह शिल्पा भोसले, सरपंच रामसिंग राजपूत, रघुनाथ कांबळे, सुरेश चौगुले, बाळकृष्ण पाटणकर, माध्य व उच्च माध्यमिकचे मुख्याध्यापक शिवाजी कोरवी, ‘प्राथमिक’चे मुख्याध्यापक कृष्णा पाटील उपस्थित होते. प्रकाश वर्पे यांनी प्रास्ताविक केले. स्वाती थोरात यांनी सूत्रसंचालन केले. सारीका आडके यांनी आभार मानले.
...
पांजरपोळ शाहूनगर शाखा नंबर दोन
सम्राट हर्षवर्धन भारतीय सेनेतर्फे १३२ झाडे शाहू मिल चौक, शास्त्रनगर चौक, टाकाळा, राजारामपुरी, राजर्षी शाहू वसाहत येथे लावली. ठाणे-मीरा भाईंदर महापालिकेतील पाणीपुरवठा विभागातील महेश डावाने यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. राष्ट्रीय अध्यक्ष रणजित औंधकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष राहुल सोनटक्के, शहर उपाध्यक्ष भिकाजी सोनटक्के, प्रशांत अवघडे यांनी झाडे लावण्याचा उपक्रम राबविला. दाविद मोरे यांनी प्रबोधन केले. अण्णा तिळवे, सचिन दीक्षित, महादेव कोरे, महादेव सोनटक्के, भारत पाटील उपस्थित होते.
----
हर्षवर्धन सामाजिक कल्याण संस्था
हुतात्मा पार्क शाखा नंबर एकतर्फे हुतात्मा पार्क याठिकाणी डॉ. आंबेडकर जयंती साजरी केली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रणजित औंधकर यांनी नियोजन केले. उपाध्यक्ष प्रशांत अवघडे यांनी सुत्रसंचालन केले. दगडू जांबळे, क्रांतीकुमार पाटील, भिकाजी सोनटक्के, महादेव कोरे, महादेव सोनटक्के, जयवंत पाटील, आनंदा लाखे आदी उपस्थित होते.
.......
कोल्हापूर बौद्ध अवशेष
बिंदू चौकातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला बौद्ध अवशेष विचार संवर्धन समितीचे अध्यक्ष टी. एस. कांबळे, कार्याध्यक्ष बापुसाहेब कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. विपुल वाडीकर, संजय कांबळे, प्रविण कांबळे, मानिक कांबळे, रमेश कांबळे, अनिल कांबळे, विकास आयरेकर, प्रमोद सनदी, जे. एस. चावरे उपस्थित होते.
...
भारतरत्न ज्येष्ठ नागरिक संघ
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव थोरात होते. वसंतराव खांडेकर यांनी स्वागत केले. सर्व संचालक मंडळ, श्री. थोरात यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. विमल पोखर्णीकर यांनी बुद्धवंदना सादर केली. प्रमोद हुपरीकर यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावरील माहिती सांगितली. सोनाळी (ता. कागल) येथील जयश्री पार्टे यांनी बाबासाहेबांच्या जीवनावरील गीत सादर केले. युवराज राजवो यांनी आभार मानले.
...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून बिंदू चौक येथील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. स्वयंसेवकांनी बुध्दवंदना म्हटली. जिल्हा संघचालक डॉ. सुर्यकिरण वाघ, जिल्हा कार्यवाह केदार जोशी, समरसता विभागाचे सुनील वांकर, संदीप कांबळे, उमेश कांबळे, विवेक मंद्रुपकर, अनिरुद्ध कोल्हापुरे, ॲड. सुधीर वंदूरकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
...
एस.बी.आय. कोल्हापूर क्षेत्रीय कार्यालय
बिंदू चौक येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास क्षेत्रीय व्यवस्थापक विवेककुमार सिन्हा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. ‘एस.बी.आय.’चे महेश वाघमारे, राहूल कांबळे, परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल कुरणे, लहुजी साळवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे, राहूल गणेशार्चाय उपस्थित होते.
...
रक्तदान शिबिरास प्रतिसाद
ईस्टर आणि गुड फ्रायडे तसेच डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ख्रिश्चन एकता मंच, क्राईस्ट चर्च यूथ ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर घेतले. सुरवातीला रेव्हरंड बी. जे. मोरे यांनी प्रार्थना केली. ४७ लोकांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्याला ख्रिश्चन एकता मंचमार्फत वस्तू, प्रमाणपत्र दिले. अमित भोरे, जॉन विजय भोरे, पास्टर विक्रम मंडी, प्रमोद शेंडगे, जोशवा सावंत, अँड्र्यू प्रशांत माळी, पास्टर सचिन धनवडे, निर्मला सालडाणा उपस्थित होते.
...
मॉडर्न शिक्षण संस्था
फुलेवाडी रिंग रोडवरील मॉडर्न शिक्षण संस्थेच्या शुभंकरोती इंग्लिश प्ले स्कूल, कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन संजय काशिद, गणपतराव सोनवणे यांचे हस्ते झाले. रूपाली डोणे, योगिनी नवाळे यांनी मनोगत व्यक्त केले. मॉडर्न शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. संदेश कचरे, रसिका पोतदार, सुरेखा काशीद, सीमा किल्लेदार, भूमी सोनवणे उपस्थित होते. जयश्री गुरव यांनी स्वागत केले. विश्वेश्वर पाटील यांनी आभार मानले.
-------

सावर्डे दुमाला परिसर
शिरोली दुमाला : सावर्डे दुमालासह सडोली, शिरोली, मांडरे, चाफोडी, गर्जन, आरळे परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात झाली. सावर्डे दुमालात प्रतिमा पूजन सरपंच भगवान रोटे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामसेवक पांडुरंग बिडकर, उपसरपंच प्रकाश कदम, पोलिसपाटील पंकज गुरव, पांडुरंग पाटील, दत्तात्रय कारंडे, बचाराम जाधव, दामाजी रोटे, तुषार निकम, हिंदुराव भोसले, रघू खाडे, एकनाथ कांबळे, बाजीराव कांबळे, महादेव कांबळे, तुकाराम कांबळे, तातोबा कांबळे, सरदार भोसले, गणेश भोसले, पंढरीनाथ निकम, पिराजी मोहिते, रंगराव कदम, गणेश कारंडे उपस्थित होते. सूत्रसंचालन रवी कांबळे यांनी केले. आभार प्रकाश कांबळे यांनी मानले.
-
साने गुरुजी वसाहत
इंदुमती जाधव विद्यालय संकल्प माध्यमिक विद्यालय प्रेरणा बालक मंदिर यांच्यातर्फे संभाजी चौगुले यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले. पी. पी. सुतार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वषयी मनोगत व्यक्त केले. आर. डी. पाटील, अनिता पाटील, सुषमा सुतार, दत्तात्रय पाटील, यशवंत रानगे, सागर पाटील, तेजस्विनी स्वामी, सुनीता पाटील ,पिंटू नाईक, यादु भोये, सृष्टी माने, कविता शिंदे,संगिता माडीवाले आदी उपस्थित होते. अवधूत कुलकर्णी यांनी आभार मानले.
--------
फक्त फोटो : 95822
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी झाली. मुख्य प्रशासकीय भवन इमारतीच्या पोर्चमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी अभिवादन केले. डॉ. रणधीर शिंदे, व्याख्याते डॉ. रमेश कांबळे, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. तानाजी साळुंखे, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, डॉ. प्रकाश कांबळे, तंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉ. शिवलिंगप्पा सपली, डॉ. अविनाश भाले, डॉ. दीपा श्रावस्ती यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
...
फक्त फोटो : 95863
कोल्हापूर : कसबा बावडा येथील आरोग्य विभागाच्या कार्यालयामध्ये डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. शहर महानगर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे संघटक शंकर चेचर, अन्य सफाई कर्मचारी, मुकादम उपस्थित होते. अभिवादन केले. आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, मुकादम अजय मिरा शेख, कैलास देते, प्रभुदास दाभाडे, मनोज कोरणे, प्रकाश लोंढे, सतीश दाभाडे, सुरेश गाडगे, गजानन शृंगार, इतर कर्मचारी उपस्थित होते.
...
फक्त फोटो : 95839
कोल्हापूर : जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटना बालकल्याण संकुल येथे कार्यवाह पद्मजा तिवले यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. प्रवेशित मुली संजना कवडे, अमृता जाधव, दिया पोळ, अर्पिता पवार यांनी मनोगते व्यक्त केली. मुलींच्या विभागात श्रीनिधी भुरके यांच्यातर्फे ध्यानधारणा घेतली. अधीक्षक सचिन माने, द्रौपदी पाटील, नजिरा नदाफ, मीना भाले, टी. एम. कदम उपस्थित होते. अधीक्षक पी. के. डवरी यांनी प्रास्ताविक केले. शरयू मोरे यांनी आभार मानले.
...
फक्त फोटो : 95798
कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १३२ बाल गायक-गायिकांनी एकावेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सांघिक गायन करून डॉ. आंबेडकर निर्मित भारतीय संविधानाला मानवंदना दिली. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सलाम संविधान हा कार्यक्रम झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com