कांदा, बटाट्याला मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदा, बटाट्याला मागणी
कांदा, बटाट्याला मागणी

कांदा, बटाट्याला मागणी

sakal_logo
By

96426
कोल्हापूर : लक्ष्मीपुरी मंडईत भाजीपाल्यांची आवक भरपूर झाली होती. (छायाचित्र : अमोल सावंत)


फ्लॉवर, कोबी भरपूर; दर आहेत स्थिर
कोल्हापूर, ता. १६ : काहीसा पिवळसर झालेला फ्लॉवर दहा रुपयाला... निदान पाच रुपयाला तरी घ्या, अशी विनवणी विक्रेत्यांकडून सुरू होती. इतका फ्लॉवर मंडईत येऊन पडला होता. कोबीची अवस्थाही तशीच होती. अन्य भाजीपाला, फळभाज्याचे दरही मागील आठवड्यात होता, तसाच आहे.
...
चौकट
फळभाजी दर (प्रतिकिलो रुपये)
हिरवी वांगी *१०/२०
फ्लॉवर *५/१०
कोबी *५/१०
जवारी गवारी *२९ रुपये पावशेर
लाल बिट *५/१० रुपये एक नग
शेवगा *१० रुपयाला दोन पेड्या
ढब्बू मिरची *४०
दोडका *४०
भेंडी *४०
वरणा *६०
कारले *६०
पडवळ *२० रुपयाला एक नग
वाल शेंग *४०
काटे काकडी *२०
हिरवी मिरची *५०
दुधी भोपळा *१० रुपयाला एक नग
आल्ले *८०
ब्रोकोली *२० रुपये एक नग
कच्ची केळी *४०/५० रुपये डझन
लाल भोपळा *४०
मक्का कणीस *१० रुपयाला एक नग
कर्नाटकी भाजीचा कोहळा *८०/१०० रुपये नग
सुरण गड्डा *८०
आळू गड्डा *८०
...
चौकट
पालेभाज्यांचे दर (प्रतिपेंडी) मेथी *२०
लाल माट *१०
तांदळी *१०
शेपू *१०
चाकवत *१०
कोथिंबीर *५/१०
कांदापात *१५
ाआंबाडा *१०
आंबट चुका *१०
पालक *१०
...

बटाट्याबरोबर कांद्यालाही वाढली मागणी
कोल्हापूर, ता. १६ : ऊन तापू लागले तसे बटाट्याला मागणी वाढू लागली आहे. कारणही तसेच आहे. बटाट्याचे चिप्स तयार करून ते उन्हात वाळवायचे. पुढील वर्षांपर्यंत ते पुरवून वापरायचे. उपवास असो की, सणवार. बटाट्याचे चिप्स वर्षभर अशा पद्धतीने वापरले जातात.
बटाट्याबरोबर हेळवी लालभडक कांदा अन्‌ पांढऱ्या कांद्यालाही अशीच मागणी आहे. चटणी तयार केल्यानंतर मसाल्यात हेळवी लाल कांदा, पांढरा कांद्याची पेस्ट वापरली जाते जी कोल्हापुरी चटणीला चव देते. ही चटणी मग अन्नपदार्थालाही चविष्ठ बनवते. हेच कोल्हापुरी चटणीचे आगळेवेगळे वैशिष्ठ्य आहे.
बटाटा चिप्ससाठी मोठ्या आकाराचा बटाटा लागतो. हा बटाटा प्रथम धुवून घेतला जातो. मग त्याचे पातळ काप मशिनने तयार केले जातात. पुन्हा बटाट्याचे पातळ काप पाण्यात टाकायचे. त्यावर तुरटी फिरवायची. जेणेकरून स्टार्च वेगळा होतात. हा स्टार्च हळूहळू भांड्याच्या तळाला जाऊन बसतो. मग हे पातळ काप बाहेर काढून हलकाशा गरम पाण्यातून बाहेर काढायचे. दिवसभर उन्हात वाळवायचे. दोन ते तीन वाळवणे झाले की, बटाटा चिप्स तयार होतो. मग, हा बटाटा चिप्स्‌ प्लास्टिकच्या बरणीत ठेवला जातो.

हे चिप्स बर्थ डे सेलिब्रेशन, सणासुदीला वापरले जातात. याकरिता जानेवारी ते मे दरम्यान हा बटाटा घेऊन चिप्स तयार करावे लागतात. विशेषत: इंदुरी बटाट्याला अधिक मागणी आहे. कारण, तो चवीला उत्कृष्ट असून, आकाराने मोठाही असतो. जेणेकरून चिप्स आकाराने मोठे होतात. असे चिप्स तळून खाल्ले की, निश्‍चित चविष्ठ होतात.
...
चौकट
येतो कुठून?
बटाट्याच्या सालीचा रंग पिवळसर असतो तर आतील गर पांढऱ्या रंगाचा असतो. बटाट्यामध्ये प्रथिने, फॉस्फरस, गंधक, जीवनसत्त्व ‘अ’, ‘क’ असते. बटाट्यामध्ये कर्बोदकाचे प्रमाण जास्त असते. बटाट्याचे मूळ जन्मस्थळ दक्षिण अमेरिका असले तरी भारतात बटाट्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. महाबळेश्वर, पुणे, मध्य प्रदेश तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तर कर्नाटकातील बेळगावमध्ये बटाटे मोठ्या प्रमाणात उत्पादित केले जातात. चंदगड, बेळगावी बटाटा हा ऑक्टोबर ते डिसेंबर कालावधीत बाजारपेठेत येतो.
...
चौकट
असे आहेत दर (किलोप्रमाणे)
हेळवी कांदा*१५/२०
बटाटा*१५/२०
...
चौकट
सोने-चांदीचे दर (प्रतितोळा/ प्रतिकिलो) रविवारी घेतलेले दर)
सोने ---- प्रति तोळा
चांदी ---- प्रति किलोलो