घरफाळा बिले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफाळा बिले
घरफाळा बिले

घरफाळा बिले

sakal_logo
By

घरफाळा विभागाची नवीन
बिले ऑनलाईन प्रसिध्द
सहा टक्के सवलत सुरू
कोल्हापूर, ता. २४ : घरफाळा विभागाने यंदाची नवीन बिले ऑनलाईनवर प्रसिध्द केली आहेत. यंदाचा घरफाळा एकरकमी भरल्यास ३० जूनअखेर ६ टक्के सवलत दिली आहे.
नवीन बिले नागरिकांना पोस्टातर्फे घरपोच पाठविण्याची कायर्वाही सुरू आहे. नागरिकांनी बिले येण्याची वाट न पाहता मागील वर्षी भरणा केलेल्या रकमेची पावती, बिल घेऊन सर्व नागरी सुविधा केंद्रामध्ये भरणा करण्याची सोय उपलब्ध केली आहे. सुटीचे दिवस वगळून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ९.०० ते दुपारी चारपर्यंत बिले भरता येणार आहेत. संकेतस्थळावरून वा युपीआय वॉलेटसव्दारे बिल भरता येणार आहे. मोबाईल, ई-मेल ऑनलाईन रजिस्ट्रेशनची सुविधा भविष्यात बिले ऑनलाईन उपलब्ध होण्यासाठी ज्यांचे मोबाईल, ई-मेल महापालिकेकडे रजिस्ट्रेशन नाही. त्यांना नाव, पत्ता, करदाता क्रमांक, मोबाईल क्रमांक व ई-मेलच्या माहितीसाठी वेबपेजवर गुगल फॉर्मची लिंक उपलब्ध करुन दिली आहे. हा फॉर्म भरून माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.