Wed, October 4, 2023

परिश्रम हेच यशाचे गमक ः श्रध्दा चव्हाण
परिश्रम हेच यशाचे गमक ः श्रध्दा चव्हाण
Published on : 24 April 2023, 2:34 am
परिश्रम हेच यशाचे गमक ः श्रध्दा चव्हाण
भादवण, ता. २४ ः नियोजनबध्द पध्दतीने केलेला अभ्यास व घेतलेले परिश्रम यामुळे उपशिक्षणाधिकारी पदापर्यंत गवसणी घालता आली. परिश्रम हेच यशाचे गमक असल्याचे नुतन उपशिक्षणाधिकारी श्रध्दा चव्हाण यांनी सांगीतले.
पेद्रेवाडी (ता. आजरा) येथील (कै) केदारी रेडेकर हायस्कूलमध्ये ‘मी कशी घडले’ हा उपक्रम झाला. चव्हाण यांचा रेडेकर संस्था समुहाच्या अध्यक्षा श्रीमती अंजनाताई रेडेकर यांच्याहस्ते सत्कार झाला. उपशिक्षणाधिकारी पदापर्यंतचा प्रवास त्यांनी उलघडला. या प्रवासातील आलेले अनुभव मांडले. श्रीमती रेडेकर अध्यक्षस्थानी होत्या. टेट परीक्षा उतीर्ण झाल्याबद्दल सुविधा वासीकर यांचा सत्कार झाला.मुख्याध्यापक सुनिल चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. आर. एस. पाटील यांनी सुत्रसंचालन केले. व्ही. बी. देऊसकर यांनी आभार मानले.