/इचल :धोकादायक जलकुंभ

/इचल :धोकादायक जलकुंभ

99206

जलकुंभाला ढपले, जिने मोडकळीस
इचलकरंजीतील चित्र; कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात; दुरुस्तीची गरज

इचलकरंजी, ता. २८ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काही जलकुंभांनी साठी गाठली आहे. इतकी वर्षे वातावरणाचा मारा सहन करीत उभे असलेल्या जलकुंभांची वेळीच डागडुजी न झाल्याने त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. जयहिंद मंडळ व गुरू चित्रमंदिरजवळील जलकुंभांची स्थिती दयनीय आहे. या जलकुंभांचे स्लॅबचे ढपले पडले आहेत. तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खराब अवस्थेतील जलकुंभांची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे.
शहराला १५ जलकुंभांमार्फत पाणीपुरवठा होतो. काही जलकुंभांची उभारणी ५८ ते ६० वर्षापूर्वीची आहे. इतकी वर्षे पाण्याची साठवण होणाऱ्या या जलकुंभांना डागडुजीची गरज भासत आहे. जलकुंभाची जिने, स्लॅब चे ढपले तसेच टाकीच्या काही भागातुण पाणी लिकेज होताना दिसते. काही वर्षापूर्वी चार जलकुंभांचे वालचंद इंजिनिरिंग कॉलेजकडून स्ट्रक्चर ऑडिट केले होते. अहवालनुसार तीन जलकुंभ तातडीने दुरूस्तीची आवश्यकता तर एक निर्लीकरण करण्याचे स्पष्ट केले होते. मात्र अद्याप जलकुंभांची दुरूस्ती न झाल्याने ती धोकादायक स्थितीत उभी आहेत. धोकादायक अवस्थेत पाणीपुरवठा सुरू असून तेथे कर्मचारी सेवा बजावतात.
-----------
प्रतिक्रिया
साईट क्रमांक १०२, फिल्टर हाऊस, गुरुचित्र मंदिर अशा तीन ठिकाणी नवे जलकुंभसाठी मंजुरी घेतली होती. ऑडिट अहवालानुसार जलकुंभांची मजबूतीकरणाच्या सूचना केल्या होत्या. जलकुंभांमधील साठवण क्षमता शहराला पुरेल इतकी असल्याचा निर्वाळा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने दिला होता.
- विठ्ठल चोपडे, माजी पाणीपुरवठा सभापती.
---------
कोट
तीन ठिकाणी जलकुंभाचे काम सुरू आहे. दुरवस्थेतील जलकुंभांचे स्ट्रक्चर ऑडिट केले आहे. त्यानुसार काहींचे मजबुतीकरण केले आहे; तर काही जलकुंभांची दुरुस्ती करण्यात येईल.
- बाजी कांबळे, जलअभियंता महापालिका
-----------
दृष्टिक्षेप
नवे बांधण्यात येणारी जलकुंभे* क्षमता*
साईट क्रमांक १०२,* १३ लाख*
फिल्टर हाऊस,* २५ लाख*
गुरू चित्रमंदिरजवळ* १३ लाख*

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com