बांधकामला मिळाले २०० कोटी

बांधकामला मिळाले २०० कोटी

जिल्‍हा परिषद ... लोगो
...
(फोटो बी डी.चेचर देत आहेत)
....

‘बांधकाम’ला २०० कोटी, दर्जाचे काय?

महिन्यात एकही टेंडर नाही; मंत्री, अधिकाऱ्यां‍च्या सुचनांकडे दुर्लक्ष

सदानंद पाटील, सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर,ता.२९:जिल्‍हा परिषदेच्या बांधकाम विभागाला यावर्षी तब्‍बल २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्‍ध झाला आहे. यातील मार्च २३ अखेर सुमारे १०० कोटी रुपयांची कामे झाली आहेत. मात्र उर्वरीत १०० कोटींच्या कामाचे एकही टेंडर मागील महिना, दीड महिन्यात झालेले नाही. बांधकाम विभाग मार्चअखेर झालेल्या कामांच्या ''वसुली''त दंग आहे. मंजूर झालेल्या कामांचा पाठपुरावा करण्यात आणि महत्‍वाचे म्‍हणजे कामाची गुणवत्ता टिकवण्यातही बांधकाम विभाग सपशेल अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे.

ग्रामीण भागातील विकासकामात जिल्‍हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे योगदान मोठे आहे. गावातील रस्‍ते, गटर्स, शाळा, अंगणवाडीपासून प्राथमिक आरोग्य केंद्र, पर्यटनस्‍थळांच्या विकासापर्यंतची कामे बांधकाम विभाग करत असते. शासकीय इमारती, पंचायत समित्यांपासून मुख्यालय इमारत आणि अधिकारी, पदाधिकारी निवासस्‍थानांची व्यवस्‍था याच विभागाकडे आहे. त्यामुळे या विभागाला मोठ्या प्रमाणात निधीही उपलब्‍ध होतो. यावर्षीही जिल्‍हा परिषदेला २०० कोटींचा निधी उपलब्‍ध झाला असून मागील वर्षात १०० कोटींचा खर्च झाला आहे. उर्वरीत निधीतून दुरुस्‍तीसह नवीन कामांची उभारणी होणार आहे.

जिल्‍हा परिषदेच्या कोणत्याही विभागाला बांधकामसाठी निधी आला की त्याची जबाबदारी बांधकाम विभागाची राहते. याचा पाठपुरावा करुन त्यातील अडचणी वरिष्‍ठांच्या निदर्शनास आणून देण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे. मात्र यातच हा विभाग अपयशी ठरत आहे. मुख्यालयातील विकासकामांसाठी तर तब्‍बल २० कोटींपेक्षा अधिकची रक्‍कम मंजूर करण्यात आलेली आहे. यातून मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यां‍नी सुचवलेल्या विविध कामांचा समावेश आहे. मात्र हीच कामे करण्यास बांधकाम विभागाला वेळ मिळालेला नाही.

...

योजनेचे नाव उपलब्‍ध निधी

आमदार स्‍थानिक विकास कार्यक्रम २७ कोटी ४ लाख
डोंगरी विकास कार्यक्रम १४ कोटी ३१ लाख
पर्यटन विकास कार्यक्रम ५ कोटी ३८ लाख
ग्रामीण रस्‍ते मजबुतीकरण २८ कोटी ५५ लाख
इतर जिल्‍हा रस्‍ते मजबुतीकरण २९ कोटी ४९ लाख

एकूण १०४ कोटी ७९ लाख (सुमारे)
...

‘बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना अजून जिल्‍हा परिषद आणि तेथील कामकाजाची कल्‍पना नाही. शिरोळ तालुक्यातील रस्‍ते कामाचा गोंधळ करण्यात त्यांनी महत्‍वाची भूमिका बजावली आहे. तालुक्यातील कामात मोठे घोटाळे आहेतच, पण मुख्यालयातही असाच प्रकार सुरु आहे. त्याचा लेखाजोखा पुराव्यानिशी मांडून संबंधित अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांवर कारवाई करण्यास भाग पाडू.

राजवर्धन निंबाळकर, माजी सदस्य
...

मुख्यालयातच गुणवत्तेचे काम नाही

जिल्‍हा परिषदेच्या चौथ्या मजल्याचे काम सुरु असताना सर्वच मजल्यावरील खिडक्यांचे काम अत्यंत ओबडधोबड करण्यात आले आहे. मुख्यालयातील अनेक खोल्यांना गळती लागली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यां‍च्या दालनाला तर बुरशी लागली आहे. चौथ्या मजल्याचे काम पूर्ण होवून चार महिने झाले आहेत. मात्र अजून फर्निचरची व्यवस्‍था नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com