केबल वॉर मधून चाकू हल्ला

केबल वॉर मधून चाकू हल्ला

फोटो नितीन देईल.
--------

केबल वॉरमधून ऑपरेटरवर चाकू हल्ला

शिवाजी उद्यमनगरातील घटना ः एकजण ताब्यात, गुन्हा दाखल, नवी केबल घेण्याचा आग्रह धरल्याचे कारण

कोल्हापूर, ता. २९ ः जुन्या कंपनीची केबल बंद करून दुसऱ्या कंपनीची केबल घेण्यासाठी ग्राहकांकडे आग्रह धरल्याच्या कारणावरून आज शिवाजी उद्यमनगरात चाकूने हल्ला झाला. या हल्ल्यात केबल ऑपरेटर सुहास शांताराम बागम (वय ३४, रा. जरगनगर परिसर) हे जखमी झाले. त्यांच्या फिर्यादीनुसार संशयित हल्लेखोर संजय मधुकर गायकवाड (वय ५६ रा. शिवाजी उद्यमनगर) याच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती राजारामपुरी पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जखमी सुहास बागम हा आज सकाळी अकराच्या सुमारास शिवाजी उद्यमनगर येथील ग्राहकांना नवीन केबल नेटवर्कची माहिती देत होता. त्यांनी घरोघरी फिरून आपली केबल घ्या, जुनी बंद करा असा त्याच्या नेटवर्कचा प्रचार केला. आपल्या केबलची माहिती त्यांनी ग्राहकांना दिली. याची माहिती तेथील स्थानिक जुने केबल ऑपरेटर संजय गायकवाड याला मिळाली. गायकवाड बागम यांना जाब विचारण्यासाठी जात होता. तेंव्हा बागम मोटारीत बसून जात होते. त्यांना खाली उतरवून माझ्या आणि केबलबद्दल ग्राहकांना काय सांगत होता, अशी विचारणा केली. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. यावेळी गायकवाडने त्याच्यावर चाकूने वार केला. दोन वार त्याच्या हातावर लागले. त्यानंतर जखमी अवस्थेत बागमला त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची महिती राजारामपुरी पोलिसांना मिळताच त्यांनी जखमीकडून प्राथमिक माहिती घेवून हल्लेखोर गायकवाड याच्या घरी जावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी सुरू आहे.
------

‘शिवाजी उद्यनगरात झालेल्या चाकू हल्ल्यात पोलिसांनी तातडीने माहिती घेतली. संशयित आरोपी संजय गायकवाड याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले आहे. फिर्यादी बागमच्या हाताला दुखापत झाली आहे. त्याच्या फिर्यादीनुसार आणि सीपीआरमधील नोंदीनुसार आयपीसी कलम ३२४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. केबल नेटवर्कच्या स्पर्धेतून हा प्रकार घडला आहे.

अनिल तनपुरे, निरीक्षक, राजारामपुरी पोलिस ठाणे
--------

वाद वेळीच थांबविणे आवश्‍यक

कोल्हापूर जिल्ह्यात दोन प्रसिद्ध केबल नेटवर्क आहेत. त्यांच्याकडून केबल ग्राहकांना सेवा पुरविली जाते. त्या दोघांमध्ये स्पर्धा आहे. याच स्पर्धेतून पूर्वीही केबल वॉर झाले होते. आज पुन्हा एकदा केबलच्या माध्यमातून हे वॉर सुरू झाले आहे. केबलच्या स्पर्धेतून सुरू असलेला हा वाद पुढे राजकीय होऊन त्याला वेगळाच रंग येतो. त्यामुळे तो वेळीच थोपविणे आवश्‍यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com