गोल्ड व्हॅल्युएशन कार्यशाळश

गोल्ड व्हॅल्युएशन कार्यशाळश

99413
कोल्हापूर : मार्केट यार्ड येथील महाराजा हॉलमध्ये गोल्ड व्हॅल्युएशन असोसिएशनच्या कार्यशाळेचे उद्‌घाटन करताना खासदार धनंजय महाडिक. या वेळी पुरुषोत्तम काळे, राजेंद्र दिंडोरकर, भरत ओसवाल, संदीप पावसकर, संजय माने, संजय नाईकवडे आदी उपस्थित होते.

गोल्ड व्हॅल्युएशन असोसिएशनच्या
समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील
खासदार धनंजय महाडिक; कार्यशाळा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ : ‘‘गोल्ड व्हॅल्युएशन असोसिएशनसमोर ज्या काही व्यावसायिक समस्या असतील, त्या सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहीन,’’ असे आश्‍वासन खासदार धनंजय महाडिक यांनी दिले.
मार्केट यार्ड येथील महाराजा बँक्वेट हॉल येथे गोल्ड व्हॅल्युएशन महाराष्ट्रतर्फे एकदिवसीय कार्यशाळा झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्‌घाटन झाले.
खासदार महाडिक म्हणाले, ‘‘सराफ व्यावसायिकांना आपण नेहमीच सहकार्य करीत आलो आहे. त्यांच्या सरकार दरबारी असणारी प्रत्येक समस्या सोडवून करण्यासाठी हवी ती मुदत केली आहे. त्यादृष्टीने गोल्ड व्हॅल्युएशन असोसिएशनच्या ज्या काही समस्या असतील त्या संदर्भात लवकरच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याबरोबर तसेच राज्य सरकारमधील संबंधित मंत्री, अधिकारी यांच्याबरोबर बैठकीचे आयोजन करून समस्यांचे समाधान केले जाईल. आज केंद्र आणि राज्यात दोन्हीकडे आपल्या विचारांचे सरकार आहे. त्या आधारे समस्यांची निराकरण करणे अधिक सोपे जाईल. त्याबरोबर आपली अर्थव्यवस्था आज पाचव्या क्रमांकावर आहे याचाही अभिमान आहे. त्यादृष्टीने सरकारचा एक घटक म्हणून आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मी आपल्या बरोबर राहीन.’’
पुरुषोत्तम काळे (मुंबई), राजेंद्र दिंडोरकर (नाशिक), भरत ओसवाल, चेतन राजापूरकर (नाशिक), राजाभाऊ वाईकर (पुणे), दिपक देवरुखकर (मुंबई), संजय वाघखाने यांच्यासह ‘जीजेईपीसी’चे मिथिलेश पांडे यांनी मार्गदर्शन केले. सतीश पितळे, कालिदास काळंदकर, संतोष बडेकर, समीर शाह यांच्यासह गोल्ड व्हॅल्युएशन असोसिएशन कोल्हापूर कार्यकारणी संदीप पावस्कर, संजय माने, संचालकांनी कार्यशाळेचे आयोजन केले. जिल्हा सराफ संघाचे सचिव माणिक जैन, संचालक अशोक झाड, प्रकाश बेलवलकर, तुकाराम माने, विजयकुमार भोसले, संजय चोडणकर आदी उपस्थित होते. दरम्यान, दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेला व्यावसायिकांनी प्रतिसाद दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com