समृद्ध भारत बालसंस्कार शिबीर

समृद्ध भारत बालसंस्कार शिबीर

‘समृद्ध भारत’ शिबीराचे
व्हाईट आर्मीतर्फे आयोजन
२ मेपासून प्रारंभ; ८ ते १४ वर्षे वयोगटासाठी प्रवेश
कोल्हापूर, ता. २९ : सर्वांगीण विकासासाठी सुदृढ तन व खंबीर मन आवश्यक असते. यासाठी लहान वयातच योग्य मार्गदर्शन व संस्काराची गरज असते. या पार्श्‍वभूमीवर व्हाईट आर्मीतर्फे मोफत समृद्ध भारत बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर ८ ते १४ वर्ष वयोगटासाठी असून २ ते १२ मे दरम्यान व्हाईट आर्मी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र, क्रशर चौक येथे होणार असल्याची माहिती संस्थपाक अध्यक्ष अशोक रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी वनस्पती तज्ज्ञ मधुकर बाचूळकर, जेष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी, शाहीर राजू राऊत उपस्थित होते. 
दोन सत्रामध्ये चालणाऱ्या या शिबिरामध्ये सकाळच्या सत्रात आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत या मुलांना वेगवेगळे निसर्ग व मानवनिर्मित आपत्तीची ओळख व त्याचा सामना कसे करणे त्याचं तंत्रशुद्ध माहिती, सकाळच्या दुसऱ्या सत्रामध्ये समाजातील वेगवेगळ्या शासकीय ट्रॅफिकचे नियम त्यानंतर सायबर गुन्हे, मोबाईलचे दुष्परिणाम वेगवेगळे चित्रपट त्याचबरोबर शौर्यगाथा पारंपारिक खेळाची ओळख त्याच बरोबर काही मनावर बिंबवणारे असे वक्ते जेणेकरून भविष्यातील भारत समृद्ध कसा बनेल या विषयावर तज्ञ मार्गदर्शक करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जंगल सफारी, किल्ले पर्यटन इतिहासाची माहिती साठी एकदिवसीय सहल असणार आहे. मुलांना त्यांचे मनोबल उंचावणे, प्रत्येक आपत्तीशी सामना करण्याचे धाडस व भविष्यामध्ये देशासाठी देश प्रेम वाढवण्याचे काम या शिबिराद्वारे करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com