निपाणी : सहा पदरीकरण

निपाणी : सहा पदरीकरण

ग्राउंड रिपोर्ट
- राजेंद्र हजारे, निपाणी

nip0102
L99770
तवंदी : येथील घाटातील दुसऱ्या वळणावरील अपघातग्रस्त रस्ता.

nip0103
99771
तवंदी : घाटात दुसऱ्या वळणावर भुयारी रस्त्यासाठी सुरू असलेले काम.

nip0104
99772
तवंदी : घाटातील वरच्या वळणावर डोंगरातून काढला जात असलेला रस्ता.

nip0105
L99773
तवंदी : घाटाच्या प्रारंभी सहापदरीकरणाचे सुरू असलेले काम.

nip0106
L99774
तवंदी : घाटाच्या पायथ्याशी असलेला वळणदार रस्ता.
(सर्व छायाचित्रे : संजय डिजिटल फोटो, निपाणी)
---

तवंदी घाटात रुंदीकरणाचे आव्हान!
---
सहापदरीकरणात डोंगराचे अडथळे; पावसाळ्यापूर्वी डोंगर पोखरणार
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कात्रज घाटानंतर तवंदी येथील सर्वाधिक अवघड आणि अडथळ्यांचे काम ठरले आहे. येथील घाटाचे सहापदरीकरण करण्याचे आव्हान आहे. घाटातील विशिष्ट प्रकारची जडणघडण, उंची, खडकाचा कठीणपणा, काही ठिकाणी अति भुसभुशीत माती, पावसामुळे डोंगराला पडलेल्या भेगा आणि या परिस्थितीत काम करताना वाहतूकही सुरू ठेवण्याचे महाकठीण काम आहे. यात कंत्राटदार, नियोजन करणारे खाते, नागरी खाते, वाहतूक खाते या साऱ्यांची परीक्षा पाहिली जाईल. तवंदी घाटात सहापदरीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला असून, त्याचा हा ग्राउंड रिपोर्ट!

-----------------

राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरण कामाने निपाणी, कोगनोळी भागासह इतर ठिकाणी वेग पकडला आहे. पहिल्या टप्प्यात झाडे तोडण्यासह रस्त्यांचे सपाटीकरण झाले. त्यानंतर रस्त्यांचे मुरुमीकरण व काँक्रिटीकरण सुरू झाले आहे. तवंदी घाटात प्रशासकीय सूचनेनुसार राष्ट्रीय महामार्गालगतचा डोंगर फोडला जात असून, त्यासाठी जेसीबीसह विविध अत्याधुनिक यंत्रांचा वापर केला जात आहे. पण, या घाटात प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकांच्या कौशल्याचे कौतुक करावे लागेल. येत्या पावसाळ्यापर्यंत डोंगर फोडण्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या असून, त्यादृष्टीने जोरदारपणे कामकाज सुरू आहे.

*सुरक्षेसाठी दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंत
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या मार्गावरच तवंदी घाट आहे. पण, एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला दरी असल्याने या घाटात निरंतरपणे अपघाताची मालिका सुरू आहे. पण, सहापदरीकरणानंतर अपघात टाळण्यासाठी दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंत उभारणीचे कामही होईल. घाटाच्या मध्यभागी अधिक उंच दरडीचा कठीण दगडी भाग असल्याने येथे कामाचा वेग कमी झाला आहे. कामकाजापर्यंत सहापदरीकरणातील एकेरी मार्ग सुरू करण्याच्या हालचाली आहेत. पावसाच्या कालावधीत दरडी कोसळू नयेत, यासाठी उतारावर स्टेपिंग करण्यात येईल.

*सुरक्षित घाट फोडण्याचे आव्हान
महामार्गावरील तवंदी घाटात संपूर्ण डोंगर भाग आहे. याठिकाणी काळे दगड आणि मुरमाचे प्रमाण जास्त आहे. मोठ्या उंचीमुळे पावसाळ्यात वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे जेसीबी अथवा विविध यंत्रांद्वारे घाटमाथा आणि मधील भाग फोडताना दुर्घटना होण्याची भीती नाकारता येत नाही, त्यामुळे डोंगर पोखरून बोगदा तयार करण्याचे आव्हान आहे.

*दक्षता घेऊन काम सुरू
घाट परिसरात सुमारे ५०० मीटर लांबीत मातीकाम जवळजवळ पूर्ण झाले आहे. उर्वरित लांबीतील काम हे दगडाचे असल्याने अवघड स्वरूपाचे आहे. यात सुमारे २५ मीटर उंचीपर्यंत डोंगराचे खोदकाम असल्याने या भागात चार टप्प्यांमध्ये खोदकाम होईल. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील खोदकामास महिन्यापूर्वी प्रारंभ झाला आहे. हे काम करताना दगड अथवा डोंगरावरील विखुरलेली माती खाली घसरून अपघात होण्याची भीती नाकारता येत नाही. त्यासाठी घाटात दक्षता घेऊनच रुंदीकरणाचे काम केले जात आहे. जेसीबी, डंपर, रोलर, प्रेशर रोलर या माध्यमातून केलेल्या भरावावर प्रत्येक टप्प्यात काम सुरू आहे.

तीन किलोमीटर लांबीचा घाट
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कात्रज घाटानंतर मोठा आणि अवघड म्हणून तवंदी घाटाची ओळख आहे. घाटाची एकूण लांबी तीन किलोमीटर आहे. या लांबीत चार धोकादायक वळणे आहेत. त्यामुळे अपघात घडत आहेत. आता हे अपघात कमी करण्यासाठी सहापदरीकरणाच्या कामांमध्ये डोंगर पोखरून बोगदे तयार होतील. त्यामुळे तवंदी घाटातील प्रवास सुखकर होणार आहे.
------
एक नजर
*महिन्यापासून कामास प्रारंभ
*तीन किलोमीटर अंतराचा घाट
*धोकादायक तीन वळणे
*महामार्ग रुंदीकरणापासून अपघाताची मालिका सुरूच
*पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना
*सहापदरीकरणानंतर सुखकर प्रवास
*दगड, माती न घसरण्यासाठी स्टेपिंग
*पावसाळ्यापर्यंत घाट फोडण्याच्या सूचना
--------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com