ई गव्हर्नन्स उद्‍घाटन

ई गव्हर्नन्स उद्‍घाटन

99887
ई-गव्हर्नन्स प्रकल्प घरोघरी पोचवा
---
पालकमंत्री दीपक केसरकर; महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण
कोल्हापूर, ता. २ : ‘सामान्य नागरिकांना ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून महापालिकेच्या सुविधा ऑनलाईन मिळण्यासाठी हा प्रकल्प घरोघरी पोचवा. त्याची माहिती होण्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये प्रशिक्षण द्या,’ अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल्या.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या ई-गव्हर्नन्स प्रकल्पाचा प्रारंभ पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी मार्केट येथे झाला, त्या वेळी ते बोलत होते. तत्पूर्वी, महापालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे उद्‍घाटन त्यांच्या हस्ते झाले. ताराबाई पार्क येथील एम्पायर टॉवरमध्ये दवाखाना आहे. तिथे ३० चाचण्या मोफत करण्यात येतील. दुपारी दोन ते रात्री दहा अशी वेळ आहे. बाह्यरुग्ण विभागात वैद्य, स्त्रीरोग व प्रसूती, बालरोग, नेत्ररोग, त्वचारोग, मानसोपचार, कान, नाक, घसातज्ज्ञ असतील. तिथेच घरगुती घातक कचरा, घरगुती सॅनिटरी कचरा आणि ई वेस्ट संकलनासाठी स्वतंत्र बॉक्स असलेल्या टिपरचे लोकार्पणही पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते झाले. १६९ टिपरमध्ये ही व्यवस्था केली आहे.
पालकमंत्री केसरकर म्हणाले, की छत्रपती शिवाजी मार्केटची रंगरंगोटी, फरशांपासून इतर कामे करून नूतनीकरण आवश्‍यक आहे. नावीन्यपूर्ण योजनेतून निधी देऊ.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, की अद्ययावत ई-गव्हर्नन्स सिस्टिम महापालिकेत आणण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्यासह मी, पदाधिकारी प्रयत्नात होतो. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपायुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, शहर अभियंता हर्षजित घाटगे, जल अभियंता नेत्रदीप सरनोबत, आरोग्य उपसंचालक डॉ. पी. एस. कांबळे, अमित कामत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील देशमुख, आरोग्याधिकारी डॉ. रमेश जाधव, शारंगधर देशमुख, राजेश लाटकर, सत्यजित कदम, विजयसिंह खाडे-पाटील, नीलेश देसाई, अजित ठाणेकर, वैभव माने, विनायक फाळके, सिस्टिम मॅनेजर यशपालसिंग रजपूत आदी उपस्थित होते. प्रशासक डॉ. बलकवडे यांनी आभार मानले.
...
चौकट
पावसाळ्यात काँक्रीट रस्त्याचे काम
रस्त्यांसाठी शासनाने १२० कोटी दिले आहेत. त्यातून पावसाळ्यात काँक्रीटचे काम करून घ्या. तसेच, ७१ कोटींचा डांबरी रस्ते पॅचवर्कसाठी प्रस्ताव दिला आहे. त्यालाही लवकरच मान्यता मिळेल. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीचा प्रस्तावही सादर केला आहे. त्याला लवकर मान्यता मिळेल, असे पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.
.....
चौकट
एकमेकांवर स्तुतिसुमने
काँग्रेस आघाडीने सुरू केलेल्या कामाचे उद्‍घाटन शिंदे-फडणवीस सरकारमधील पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. या वेळी पालकमंत्री केसरकर यांनी तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी अनेक नवीन गोष्टी केल्या. आमदार ऋतुराज पाटील हे सकारात्मक काम करीत आहेत. यापुढील काळात सर्वांनी मिळून विकासासाठी एकत्र काम करूया, असे सांगितले; तर आमदार पाटील यांनी जे काम आम्ही सुरू केले ते पालकमंत्र्यांच्या हस्ते पूर्ण होत आहे, याचा आनंद असल्याचे सांगितले.
.......
चौकट
पहिली ई-लायब्ररी
पितळी गणपतीजवळील एम्पायर टॉवरमध्ये महापालिकेच्या पहिल्या ई-लायब्ररीची सुरुवात पालकमंत्र्यांच्या हस्ते झाली. सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी माफक दरात अद्ययावत सुविधा देण्यासाठी ही लायब्ररी तयार केली आहे. एकावेळेस ४० विद्यार्थी अभ्यास करू शकतील. विद्यार्थ्यांना मोफत वाय-फाय सुविधा, एसी रूम आहे. यामुळे सामान्य कुटुंबातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना मोठी संधी मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com