डॉ. ए. डी. शिंदे कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्यूहला प्रतिसाद

डॉ. ए. डी. शिंदे कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्यूहला प्रतिसाद

gad29.jpg
00048
भडगाव : शिंदे इंजिनिअरिंगतर्फे आयोजित कॅम्पस इंटरव्यूहमध्ये कंपनीचे एच. आर. वसीम काझी यांचा सत्कार प्रा. किशोर जोशी यांनी केला. शेजारी हेमंत करिगार, अमित शेळके.
----------------------------------------------
डॉ. ए. डी. शिंदे कॉलेजमध्ये
कॅम्पस इंटरव्यूहला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २ : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील डॉ. ए. डी. शिंदे अभियांत्रिकी महाविद्यालयात चाकणच्या लुमॅक्स इंडस्ट्रीजतर्फे कॅम्पस इंटरव्यूह झाले. त्याला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. यासाठी गडहिंग्लज, चंदगड, आजरा, भुदरगड, गारगोटी, बेळगाव परिसरातील विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. सचिव प्रा. स्वाती कोरी यांचे भाषण झाले. लेखी परीक्षा व त्यातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन निवड प्रक्रिया झाली. शंभरहुन अधिक विद्यार्थी प्रक्रियेला सामोरे गेले. १४ विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. किशोर जोशी यांनी दिली. यामध्ये डॉ. ए. डी. शिंदे इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी व कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कॉलेजचे ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे समन्वयक प्रा. साजिद सोलापुरे व प्रा. महादेव बंदी यांनी नियोजन केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com