कुलसचिवांनी स्वतः पाणी पिवून पटवली शुद्धतेची खात्री

कुलसचिवांनी स्वतः पाणी पिवून पटवली शुद्धतेची खात्री

कुलसचिवांनी स्वतः पाणी
पिऊन पटवली शुद्धतेची खात्री


कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठातील सर्व विद्यार्थी वसतिगृहांना शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो, याची खात्री कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी स्वतः पाणी पिऊन याबाबत आंदोलन करणाऱ्यांना पटवून दिली.
‘अभाविप’च्या कार्यकर्त्या, आंदोलनकर्त्यांनी काही पाण्याचे नमुने कुलसचिव डॉ. शिंदे यांना दाखविले. प्रत्यक्षात पाण्याची खातरजमा करण्यासाठी कुलसचिव डॉ. शिंदे यांनी राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे आणि अधिसभा सदस्य स्वागत परुळेकर यांच्यासह सदर आंदोलनकर्त्यांना सोबत घेऊन पाणी पुरवठ्याच्या विविध ठिकाणांना भेट दिली. सुरूवातीला त्यांनी बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयानजीकच्या शुद्धीकरण केंद्राला भेट दिली. तेथे पाण्यावर नियमानुसार होत असलेली प्रक्रिया दाखवून दिली. येथील पाणी प्राशन केले. त्यानंतर विद्यापीठाचा आर.ओ. पाणी शुद्धीकरण प्रकल्प, विद्यार्थी वसतिगृहे आणि विद्यार्थिनी वसतिगृहे येथेही भेट दिली. तेथे विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत असलेले पाणीही त्यांनी प्राशन केले. त्यांच्यासोबत शिंदे, परुळेकर यांनी पाणी पिऊन आंदोलकांना पाणी शुद्धतेबद्दल आश्वस्त केले. दरम्यान, ‘२८ आणि २९ एप्रिल रोजी स्वच्छतेसाठी आर.ओ. प्रकल्प बंद ठेवला होता. त्या कालावधीत वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी प्रतिदिन वीस लीटरच्या ४० बाटल्या पाणी बाहेरून विकत घेऊन विद्यार्थ्यांना पुरविण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत विद्यापीठ प्रशासन गंभीर आहे. सध्या विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणारे पाणी आर.ओ.द्वारे शुद्धीकरण केलेले आणि पिण्यास योग्य आहे’, अशी माहिती कुलसचिव डॉ. शिंदे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com