सहकार भारती अधिवेशन बातमी

सहकार भारती अधिवेशन बातमी

00079
कोल्हापूर : कणेरी सिद्धगिरी मठावर सहकार भारतीच्या अधिवेशनाचे आमदार प्रकाश आवाडे यांनी दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले. या प्रसंगी प. पू. काडसिद्धेश्वर स्वामी, जवाहर छाबडा, उदय जोशी आदी.


योजनांच्या अंमलबजावणीची
सहकारी बँकांना जबाबदारी द्या
आमदार प्रकाश आवाडे; सिद्धगिरी मठ येथे सहकार भारतीची प्रदेश कार्यकारणी बैठक
कोल्हापूर, ता. २ : ‘महाराष्ट्रात सहकाराची चळवळ तळागाळातील माणसांपर्यंत पहोचली आहे. सहकारी बँकांशी सर्व आर्थिक स्तरातील घटक जोडले गेले आहेत. काही सहकारी बँकांनी महिला बचत गटांचे जाळे सर्वत्र पसरवले आहे. त्यामुळे सहकारी बँकांना जिल्हा मध्यवर्ती बँक व नाबार्डप्रमाणे शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी परवानगी द्यावी. यासाठी सहकार भारतीने पुढाकार घ्यावा. देशाला आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनण्याचे कार्य सहकार भारतीला करावयाचे आहे, असे प्रतिपादन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले. कणेरी येथील सिद्धगिरी मठावर सहकार भारतीच्या प्रदेश कार्यकारणी बैठकीत ते बोलत होते. या वेळी काडसिद्धेश्‍वर स्वामी प्रमुख उपस्थित होते.
आमदार आवाडे म्हणाले, ‘‘सहकार भारतीसारख्या संघटना सहकाराची व्याप्ती वाढवत आहेत. त्याचबरोबर सहकारामध्ये राष्ट्रीय दृष्टीकोन वाढावा यासाठी प्रयत्न करत आहेत. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीमध्ये सहकार भारतीसारख्या संघटनांची भूमिका महत्त्वाची आहे. सहकारी बँकांचे जाळे सर्वदूर पसरले आहे. सहकारी बँकांना जिल्हा मध्यवर्ती बँक आणि नाबार्ड प्रमाणे शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचे काम दिले पाहिजे.
काडसिद्धेश्वर महाराज म्हणाले, ‘‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विविध क्षेत्रात अनेक संस्था-संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहे. सर्व क्षेत्रात निरपेक्षपणे संघाचे स्वयंसेवक व संघाचा आयाम असलेल्या संस्था काम करत आहेत. काही मूठभर लोकांमुळे सहकार चळवळ बदनाम झाली. परंतु सहकार क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या संस्थाही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम सहकार भारतीच्या माध्यमातून होते.’’’
या वेळी सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी, प्रदेश महामंत्री विवेक जुगादे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जवाहर छाबडा, संजय परमणे यांची प्रमुख उपस्थिती होती. धोंडीराम पागडे यांनी आभार मानले. बैठकीस महाराष्ट्र प्रदेश संघटन प्रमुख संजय परभणी, फेडरेशनच्या उपाध्यक्ष वैशाली आवडे, स्वावलंबी भारत अभियानाचे विनय खटावकर व पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com